तब्बल 10 कोटी इनाम डोक्यावर असलेला नक्षलवादी CM फडणवीसांसमोर टाकणार शस्त्र खाली!
नक्षलवाद्यांचा चाणक्य समजला जाणारा भूपती हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार आहे. जाणून घ्या त्याच्याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

प्रतिनिधी, व्यंकटेश दुडुमवार आणि योगेश पांडे: गडचिरोली: नक्षलवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने त्याच्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. काल रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात छत्तीसगड सीमेलगत महाराष्ट्राच्या बाजूने हे सामूहिक आत्मसमर्पण झाले आहे.
10 कोटीचं इनाम असलेला भूपती करणार आत्मसमर्पण
तब्बल 10 कोटींचं इनाम असलेला भूपती हा आज (15 ऑक्टोबर) रोजी मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गडचिरोली येथील पोलीस मुख्यालया आत्मसमर्पण करणार आहे.
हे ही वाचा>> Viral News: पुण्याची वाट लागली... नदीपात्रातील हाणामारीचा 'हा' Video आणेल तुमच्याही अंगावर काटा
भूपतिवर वेगवेगळ्या राज्यात मिळून तब्बल 10 कोटी रुपये एवढं इनाम घोषित करण्यात आलं होतं. मात्र, आता त्याने मुख्य प्रवाहात येण्यासाठी स्वत:हून आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे.
गेले काही दिवस सातत्याने सोनू उर्फ भूपती वेगवेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडला पाहिजे, आणि सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहात माओवाद्यांनी आले पाहिजे अशी भूमिका मांडली होती.