Viral News: पुण्याची वाट लागली... नदीपात्रातील हाणामारीचा 'हा' Video आणेल तुमच्याही अंगावर काटा
पुण्यातील डेक्कन भागातील चौपाटी परिसरात एका हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील डेक्कन भागातील चौपाटी परिसरात एका हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती हॉटेल मालकावर खुर्च्या आणि इतर वस्तूंनी सतत हल्ला करताना दिसत आहेत. हल्ल्यात त्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर मार लागून तो रक्तबंबाळ झाल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक चालत असताना आरोपींपैकी एका व्यक्तीस धक्का लागल्याने अचानक वाद सुरू झाला. या वादाचं पर्यवसान हे काही क्षणांतच मारहाणीमध्ये झालं. आरोपींनी हॉटेल मालकाला रस्त्यातच अडवून त्याच्यावर खुर्च्या आणि इतर वस्तूंनी हल्ला केला.
हे ही वाचा>> पुणे: तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप, नंतर तरुणीला मारहाण, अखेर बॉयफ्रेंडची हत्या, नंतर मृतदेह चादरीत गुंडाळून...
या घटनेत हॉटेल मालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेक लोकांनी हा प्रकार पाहिला, मात्र कोणीही हस्तक्षेप केला नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.