पुणे: तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप, नंतर तरुणीला मारहाण, अखेर बॉयफ्रेंडची हत्या, नंतर मृतदेह चादरीत गुंडाळून...

मुंबई तक

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणीने लिव्ह इनपार्टनरचीच हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना आहे, नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

pune crime
pune crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ

point

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीने तरुणाला संपवलं

point

नेमकं कारण काय?

Pune Crime : पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणीने लिव्ह इन पार्टनरचीच हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना आहे. तरुणीचा आरोप आहे की, लिव्ह इन पार्टनरने तरुणीला अनेकदा मारहाण करत अत्याचार केला, याच त्रासातून तिने दोघांना आपल्या हाताशी घेतलं आणि मारहाण केली. संबंधित प्रकरणात प्रेयसीसह दोघांना अटक करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्याच्या 'या' तारखेला काही राशींना निर्माण होणार धोका, तयार होतोय एक वाईट योग

अटकेत असलेल्यांची नावे समोर 

अटक करण्यात आलेल्या मुलांची नावे आता समोर आली आहे. कुमारी बिजलौराम उराव (वय 23), आकाश बिजलौराम उराव (वय 21) आणि बालमुनी कुमारी रामचंद्र उराव (वय 21) अशी नावे आहेत. तिघेही मूळचे झारखंडचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मृत झालेल्या तरुणाचे नाव मुकेश कुमार (वय 24) असे आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तीन वर्षांपासून रिलेशनशिप

या प्रकरणात पोलिसांनी माहिती दिली की, आरती कुमारी आणि मुकेश हे गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि एकत्र राहायचे. तथापि, मुकेश हा आरतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा तसेच वादही घालायचा. आरतीने याच कारणाने आपला भाऊ आकाश आणि त्याचा मित्र बालमुनीला हाताशी धरलं आणि 2 ऑक्टोबर रोजी मुकेशवर क्रूरपणे हल्ला केला, त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर प्राणघातक हल्ला केला, याच हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

हे ही वाचा : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातील अंतरिम सुनावणी संपली, काय काय घडलं?

पोलिसांनी सांगितलं की, 'पुरावा नष्ट करण्यासाठी, त्यांनी मुकेशचा मृतदेह हा ब्लँकेटमध्ये गुंडाळण्यात आला होता. त्यानंतर चाकणमध्ये एका निर्जनस्थळी गवतावर फेकून देण्यात आला. ही धक्कादायक प्रकार 4 ऑक्टोबर रोजी उघडकीस आला होता. याचमुळे पीडितेची ओळख पटवणे आणि गुन्हेगारांचा शोध घेणं हे पोलिसांसाठी आव्हानच होते, असे पोलीस म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp