शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातील अंतरिम सुनावणी संपली, काय काय घडलं?
Shiv Sena Party and Symbol Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातील अंतरिम सुनावणी संपली, काय काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातील अंतरिम सुनावणी संपली

सुनावणीदरम्यान कोर्टात काय काय घडलं?
Shiv Sena Party and Symbol Supreme Court Hearing , नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचं अधिकृत नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आज (दि.8) सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयाण आणि न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे राज्यातील सर्व नेतेमंडळी आणि नागरिकांचं देखील लक्ष होतं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, लवकरात लवकर निर्णय घ्यावा - कपिल सिब्बल
उद्धव ठाकरे यांच्यावतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. कपिल सिब्बल याबाबत बोलताना म्हणाले, “जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत तातडीचं आहे आणि लवकरात लवकर यावर निर्णय घेणं गरजेचं आहे.”
या प्रकरणाची पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात यावी, अशी मागणी ठाकरेंचे वकिल कपिल सिब्बल यांनी केली, तर शिंदेंच्या वकिलांनी या प्रकरणाची सुनावणी डिसेंबर महिन्यात घ्यावी, अशी मागणी केली होती. शिवाय नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सुनावणी वेळी आम्ही आमची भूमिका 45 मिनिटांत मांडू, असं देखील कपिल सिब्बल यांच्याकडून न्यायालयात सांगण्यात आलं आहे.