विरार: प्रियकराने अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल केलं... वडिलांना मारहाण! नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

मुंबई तक

विरारमधील महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने प्रेमसंबंधातून सोमवारी (13 ऑक्टोबर) आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल!
नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकराने अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल केलं...

point

नैराश्यातून विरारमधील तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Virar Crime: विरारमधील महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने प्रेमसंबंधातून सोमवारी (13 ऑक्टोबर) आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रकरणातील पीडितेच्या प्रियकराने तिचे अश्लील फोटो काढले आणि तिला त्या फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल केल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी प्रियकराच्या या कृत्याचा जाब विचारण्यासाठी संबंधित तरुणीचे वडील तिच्या कॉलेजात गेले असता त्यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे पीडितेने नैराश्यात राहत्या बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून स्वत:ला संपवलं. 

अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केलं

मृत तरुणीचं नाव ऋचा पाटील असून ती विवा कॉलेजची विद्यार्थिनी होती. पीडिता ही B.com च्या शेवटच्या वर्षात शिकत होती. तसेच, ती विरारच्या नाना नानी पार्कमध्ये राहत होती. पीडितेचे तिच्या कॉलेजमधीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. परंतु, ऋचाच्या प्रियकराने तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केलं. यामुळे पीडितेला मानसिक त्रास झाला आणि तिने आपल्या प्रियकराच्या कृत्याबद्दल तिच्या वडिलांना सांगितलं. रागाच्या भरात ऋचाचे वडील आरोपी तरुणाला जाब विचारण्यासाठी कॉलेजमध्ये गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली.

हे ही वाचा: "आधी माझे कपडे फाडले अन् तोंडात गर्भनिरोधक गोळी..." महाविद्यालयातील विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार!

आरोपी तरुणावर कोणतीही कारवाई नाही 

हे प्रकरण महाविद्यालयाच्या प्राचार्यांपर्यंत पोहोचलं. मात्र कॉलेज प्रशासनाकडून आरोपी तरुणावर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नसून त्याला केवळ समज देऊन सोडण्यात आलं. त्यावेळी, त्या तरुणाने कॉलेजच्या बाहेर पीडितेला पुन्हा तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या सर्व घटनेनंतर ऋचा खचली आणि तिने टोकाचं पाऊल उचललं. 

हे ही वाचा: रत्नागिरी: गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; प्रवचन सांगणाऱ्या कोकरे महाराजाच्या आवळल्या मुसक्या

घराच्या गॅलरीमधून उडी मारली अन्...

सोमवारी दुपारी पीडिता कॉलेजमधून तिच्या वडिलांसोबत घरी आली. त्यानंतर, तिने तिच्या चौथ्या मजल्यावरील घराच्या गॅलरीमधून उडी मारली आणि आत्महत्या केली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर तिला बंगलीच्या कार्डीनल ग्रेशस रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु मध्यरात्री दीड वाजता तिचा मृत्यू झाला.  या प्रकरणी पोलिसांनी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp