रत्नागिरी: गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; प्रवचन सांगणाऱ्या कोकरे महाराजाच्या आवळल्या मुसक्या
रत्नागिरी जिल्ह्यातील एका गुरुकुलमधील प्रवचन सांगणाऱ्या भगवान कोकरे या महाराजाला अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

गोकूळ कांबळे, रत्नागिरी: खेड तालुक्यातील लोटे येथील ‘आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल’ येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा अत्यंत गंभीर आणि धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनंतर रत्नागिरी पोलीस विभागाने तात्काळ दखल घेत गुरुकुलाचा प्रमुख संशयित आरोपी भगवान कोकरे आणि त्याचे सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी मागील काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती. याच दरम्यान गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे याने मुलीसोबत अनेकदा अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला.
हे ही वाचा>> पती रोजगारासाठी होता बाहेरगावी, घरात पाच दिवस पत्नीसह बॉयफ्रेंडचा सुरु होता रोमान्स, सासूबाई जेवण घेऊन येताच...
पीडितेने सुरुवातीला ही घटना गुरुकुलातील एका सदस्याला सांगितली असता, त्याने याबाबत कोणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. “महाराजांची राजकीय ओळख आहे. जर कोणाला काही सांगितले, तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल,” असे सांगून तिला गप्प राहण्यास भाग पाडले. वारंवार अशा घटना घडत राहिल्याने अखेर हा सर्व प्रकार तिच्या कुटुंबीयांना समजला.
त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर खेड पोलिसांनी संशयित आरोपी भगवान कोकरे आणि प्रितेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता आणि पोक्सो अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.