पती रोजगारासाठी होता बाहेरगावी, घरात पाच दिवस पत्नीसह बॉयफ्रेंडचा सुरु होता रोमान्स, सासूबाई जेवण घेऊन येताच...

मुंबई तक

extramarital affair : विवाहित महिलेशी एका तरुणाचे प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांना लपून छपून भेटू लागले होते, असाच एक प्रकार आता समोर आला आहे.

ADVERTISEMENT

Extramarital Affair
Extramarital Affair
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित महिलेशी तरुणाचे प्रेमसंबंध

point

दोघेही एकमेकांना लपून छपून भेटू लागले

point

मोठं कांड आलं समोर

Extramarital Affair : विवाहित महिलेशी एका तरुणाचे प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांना लपून छपून भेटू लागले होते. पण कधी ना कशी त्यांचं सत्य हे सर्वांसमोर येणार हे निश्चितच होतं. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. तरुण बॉयफ्रेंड आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी पोहोचला. तेव्हा तिच्या सासू-सासऱ्यांनी दोघांनाही एका खोलीत रोमान्स करताना रंगेहाथ पकडल्याचं पाहिलं.  त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता, गावात या प्रकरणाची चर्चा झाली. त्यानंतर दोघांचंही लग्न लावून देण्यात आलं होतं. या प्रकरणात महिलेच्या पतीने सांगितलं की, माझी पत्नी जर त्याच्या प्रेमात असेल, तर तिचा विवाह हा तिच्याशीच लावून देण्यात यावा. ही घटना बिहार राज्यातील भगलपुर येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : पती गुंड तर पत्नी लेडी डॉन, एक दिवस दोघांच्यातच बिनसलं, मुलगी घरात असतानाच त्यानं पत्नीला ठोकलं

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेर जिल्ह्यातील तारापूर येथील रहिवासी साक्षी (वय 20) यांचा विवाह एका वर्षापूर्वी झाला होता. तसेच तिच्या पतीचं नाव सिकंदर कुमार सिंह असे आहे. लग्नानंतर काही दिवसातच सिकंदर उर्फ बिट्टू रोजगारासाठी बंगळुरु येथे गेला होता. 

दरम्यान, पत्नी साक्षीचा एक्स बॉयफ्रेंड राहुल सिंगच्या पुन्हा संपर्कात आली आणि त्यांचे प्रेमसंबंध पुन्हा सुरु झाले. बिट्टूने आपल्या गावातील कुटुंबापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. तिने साक्षी एकटीच राहू लागली होती. पती नोकरीसाठी बाहेरगावी गेल्याने तिने गैरफायदा घेत आपल्या एक्स बॉयफ्रेंड राहुलला घरी बोलावलं. त्यानंतर तो एक दोन नाही,तर तब्बल पाच दिवस तिच्या घरी असल्याचं सांगण्यात येत होतं. 

सासूनं सूनबाईसाठी जेवण आणलं आणि आत महिला एक्स बॉयफ्रेंडसोबत

कुटुंबियांचं जेवण बनवण्यासाठी तिने नकार दिला. आपली तब्येत व्यवस्थित नसल्याचं कारण सांगत तिने विरोध दर्शवला होता. त्याचदरम्यान, राहुल एका घराच्या छताखाली एका छोट्याशा खोलीत राहायचा. तेव्हा महिला आजारी असताना तिच्या सासू-सासऱ्यांनी सुनेसाठी जेवण आणलं. तेव्हा त्यांनी दोघांना नको त्या अवस्थेतच पाहिलं. त्यानंतर तेव्हा एकच गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp