पती गुंड तर पत्नी लेडी डॉन, एक दिवस दोघांच्यातच बिनसलं, मुलगी घरात असतानाच त्यानं पत्नीला ठोकलं
crime news : एका गुंड पतीने आपल्याच गुंड असलेल्या पत्नीची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार सुरु असताना घटनास्थळी अल्पवयीन मुलगी तिथेच होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

एका गुंड पतीने आपल्याच गुंड पत्नीची केली हत्या

दोघांमध्ये नेमकं काय घडलं?
Crime News : एका गुंड पतीने आपल्याच गुंड असलेल्या पत्नीची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार सुरु असताना घटनास्थळी अल्पवयीन मुलगी तिथेच होती. पतीचं नाव विकास अहलावत आणि मृत महिलेचं नाव रुबी हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. कारण त्यांच्यावर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडलीय.
हे ही वाचा : अलिबाग हादरलं! तरुणाचा तरुणीवर होता 'तसला' संशय, बॉयफ्रेंडची सटकली अन् गर्लफ्रेंडच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करत...
एकूण घटनाक्रम काय?
एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी विकासने आपल्या पत्नीकडे पासपोर्टची मागणी केली आणि काही कागदपत्रांची मागणी केली होती. याचवरून वादंग निर्माण झाला होता. दोघांमधील वादाने एवढं टोक गाठलं की, संतापलेल्या विकासने त्याच्याच पत्नीवर गोळीबार केला. त्यानंतर पत्नी रुबी ही कोसळली आणि पतीने घटनास्थळावरून पळ काढल्याचं सांगण्यात येत आहे.
पतीने दारू प्यायली आणि आर्थिक कारणातून बायकोला संपवलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास हा बेरोजगार होता आणि त्याला दारूचे व्यसन होतं. दारु प्यायल्यानंतर आर्थिक कारणावरून पती-पत्नींमध्ये दररोज वाद व्हायचा. मंगळवारी हा वाद इतका उफळला गेला की, विकासने त्याच्या पत्नीचा जीव घेतला. या घटनेनंतर संपूर्ण सोसायटीत भीतीचं वातावरण पसरलं आहे. हा एकूण प्रकार घडला त्यावेळी मुलगी घरीच होती. आरोपी विकासचा सध्या पोलीस शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : आईने पोटच्या मुलांचे उशीने तोंड दाबले, नंतर चौथ्या इमारतीवरून मारली उडी, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद
विकासच्या शोधासाठी त्यांनी ठिकठिकाणी छापे मारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेनं घटनास्थळ पूरतं हादरून गेलं आहे. या प्रकरणात नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.