"आधी माझे कपडे फाडले अन् तोंडात गर्भनिरोधक गोळी..." महाविद्यालयातील विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार!
यूनिव्हर्सिटीतील एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित पीडितेने चार लोकांवर शारीरिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाविद्यालयातील विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार!

पीडितेसोबत नेमकं काय घडलं?
Sexual Assault Case: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील यूनिव्हर्सिटीतील एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित पीडितेने चार लोकांवर शारीरिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
12 ऑक्टोबर रोजी दुपारी जवळपास तीन वाजताच्या सुमारास मैदानगढ पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना एक पीसीआर कॉल आला आणि त्यावेळी साउथ एशियन यूनिव्हर्सिटीमध्ये बी.टेक (B.tech) च्या पहिल्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती देण्यात आली.
पीडितेचे कपडे फाडले अन् घृणास्पद कृत्य
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासादरम्यान, चार तरुण पीडितेला ऑडिटोरिअमजवळील एका परिसरात घेऊन गेले. पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना याबद्दल माहिती देताना सांगितलं की, चार आरोपी तरुणांनी तिचे कपडे फाडले आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायला सुरुवात केली. त्यांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर, ती कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटून बाहेर आली आणि स्थानिकांकडे मदतीची याचना करू लागली. दरम्यान, या घटनेची पोलिसात माहिती देण्यात आली.
हे ही वाचा: तब्बल 10 कोटी इनाम डोक्यावर असलेला नक्षलवादी CM फडणवीसांसमोर टाकणार शस्त्र खाली!
पीडितेची वैद्यकीय तपासणी
संबंधित घटनेनंतर, पीडिता खूप घाबरली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पीडितेला रुग्णालयात नेलं आणि तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या, पोलीस आरोपींची शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.