स्मशानात गेला अन् जीव गमावला! अंत्यविधी सुरू असताना भरधाव पिकअप घुसला, एका क्षणात...

मुंबई तक

बीडमधील पाली येथे स्मशानभूमीत अंत्यविधी सुरू असतानाच अचानक एक भरधाव पिकअप टेम्पो शिरला. ज्यामुळे एका व्यक्तीचा जागी दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

cemetery, lost life, person died, pickup truck accident, funeral procession, beed news, accident, accident death
बीड अपघात
social share
google news

योगेश काशिद, बीड: बीडमधील पाली येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू असतानाच भरधाव वेगाने येणारा पिकअप थेट त्या ठिकाणी घुसला. ज्यामध्ये एक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विचित्र अपघातात   सात ते आठ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे. सध्या जखमींवर बीड शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमका अपघात कसा घडला?

पाली परिसरातील स्मशान भूमी या ठिकाणी आज ( 15 ऑक्टोबर) सायंकाळी स्वर्गीय आसराबाई किसनराव नवले यांचा अंत्यविधी सुरू होता. याच दरम्यान अचानक भरधाव वेगाने येणारा पिकअप हा थेट स्मशानभूमी परिसरात घुसला आणि हा भीषण अपघात झाला.

हे ही वाचा>> पुणे: 61 वर्षांचे आजोबा तिसऱ्या मजल्यावर गेले अन्... 'ते' दृश्य पाहताच सगळ्यांची बोबडीच वळली!

अत्यंविधीसाठी गेलेल्या संभाजी जाधवांचा स्मशानभूमीत दुर्दैवी मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे संतुलन सुटल्यामुळे हा पिकअप अंत्यविधी सुरु असलेल्या परिसरात अत्यंत वेगाने घुसला. ज्यामध्ये संभाजी विठ्ठलराव जाधव (रा. रोळसगाव, वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मसू जगताप (रा. करचुंडी, वय 45 वर्ष) आणि आश्रुबा शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. यासह आठ ते दहा जण या अपघातात जखमी झाले आहेत. यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संघटन नितीन धांडे, राहुल नवले, अनिल साळुंखे, शरद नवले, अतुल नवले, रमेश नवले, तुकाराम धसे यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp