गोपीचंद पडळकरांनी आरोप करताच बीडमधील वादग्रस्त कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची बदली
Beed News : बीडमधील वादग्रस्त कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची बदली, नेमकं कारण काय? संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बीडमधील वादग्रस्त कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची बदली

आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते आरोप
बीड : गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांना नागपूर कारागृहाची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या कार्यकाळात उघडकीस आलेल्या अनेक वादग्रस्त घटनांनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कैद्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा पेट्रस गायकवाड यांच्यावर आरोप
पेट्रस गायकवाड यांच्या कार्यकाळात बीड कारागृहात बेकायदेशीर कृत्यांबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. कारागृहाच्या आत मोबाईल फोन आणि गांजा आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. त्यानंतर या घटनेवरूनच गायकवाड यांच्यावर कैद्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या सर्व घडामोडींनंतर प्रकरणाने राजकीय रंग घेतला होता.
हेही वाचा : VIDEO : फटाका स्टॉलचं हटके प्रमोशन रील स्टारच्या अंगलट, पोलिसांनी उचलल्यानंतर म्हणाला, 'वाकड पोलीस जिंदाबाद'
गोपीचंद पडळकर यांनी केली होती देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार
राज्यातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी गायकवाड यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी केली होती. त्यानंतर बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेतूनही पडळकर यांनी अधीक्षक गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली होती.