VIDEO : फटाका स्टॉलचं हटके प्रमोशन रील स्टारच्या अंगलट, पोलिसांनी उचलल्यानंतर म्हणाला, 'वाकड पोलीस जिंदाबाद'
Pune News : फटाका स्टॉलचं हटके प्रमोशन रील स्टारच्या अंगलट, पोलिसांनी उचलल्यानंतर म्हणाला, 'वाकड पोलीस जिंदाबाद'
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

फटाका स्टॉलचं हटके प्रमोशन करणं अंगलट आलं

रील स्टारला पिंपरी चिंचवड पोलिसांनी उचललं
Pune News : दिवाळी काही दिवसांवर आली असून सगळीकडे सणासुदीचा माहोल सुरू आहे. दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतिषबाजी, सजावट, खरेदी आणि उत्साह या सगळ्याचं अनोखं आकर्षण असतं. मात्र, या उत्साहात सोशल मीडियावर फटाका स्टॉलचं प्रमोशन करण्याच्या नादात एका रिल्स स्टारला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे.
वाकड परिसरातील एका रिल्स स्टारने फटाक्यांच्या दुकानाचं प्रमोशन करण्यासाठी हटके मार्ग अवलंबला. दिवाळीपूर्व काळात लक्ष वेधण्यासाठी त्याने सोशल मीडियावर गुन्हेगारी ज्या पद्धतीने वागतात, तशा पद्धतीने शूट केलेले रिल्स टाकले. या व्हिडिओमध्ये फटाक्यांच्या दुकानाचं प्रमोशन करण्यासाठी बंदुका, धोकादायक पोझेस आणि गुन्हेगारी पद्धतीचा अभिनय दाखवण्यात आला होता. हा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याकडे पोलिसांचं लक्ष गेलं. वाकड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या रिल्स स्टारला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. त्याला अशा प्रकारचं प्रमोशन करणं कायद्याच्या दृष्टीने चुकीचं असून समाजात चुकीचा संदेश जातो, अशी समज पोलिसांनी दिली. यानंतर त्याने आपली चूक मान्य करत व्हिडिओ डिलीट केल्याचं सांगितलं.
हेही वाचा : 3 एकर जमिनीवर 3 कोटींचं कर्ज दाखवलं, वसुलीसाठी जमिनीचा लिलाव, अजित पवारांच्या निकटवर्तीयाचा प्रताप
पोलिसांनी उचलल्यानंतर रील स्टारचं आवाहन
दरम्यान, पोलिसांनी उचलल्यानंतर रील स्टार म्हणाला, माझ्याकडून चुकीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे वाकड पोलिसांनी मला समज दिली आहे. कृपया कोणी असे व्हिडीओ बनवू नये. अन्यथा वाकड पोलीस योग्य पद्धतीने समज देतील. वाकड पोलीस स्टेशन जिंदाबाद...!