बाल संरक्षण गृहात 10 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार! आईने थेट घेतली पोलिसात धाव...
एका बाल संरक्षण गृहात 10 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

10 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार!

बाल संरक्षण गृहात घडली धक्कादायक घटना

मुलाच्या आईने थेट घेतली पोलिसात धाव...
Crime News: एका बाल संरक्षण गृहात 10 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादच्या सईदाबाद परिसरातील एका सरकारी बाल संरक्षण गृहात ही घटना घडल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी मुलांचं संरक्षण आणि काळजी घेतली जाते, त्याच ठिकाणी एका 10 वर्षांच्या मुलासोबत घृणास्पद कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.
10 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार
सरकारी संरक्षण गृहात राहणाऱ्या एका 10 वर्षांच्या मुलावर त्याच संस्थेच्या सुपरवायझरने बऱ्याचदा लैंगिक अत्याचार केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मे महिन्यापासून अल्पवयीन पीडित मुलावर सतत लैंगिक अत्याचार होत होता. या घटनेमुळे पीडित मुलगा घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे तो त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत काहीच सांगू शकत नव्हता.
पोक्सो अॅक्ट (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल
संबंधित मुलगा दसऱ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या घरी गेला होता. त्यामुळे आपला मुलगा नाराज आणि शांत असल्याचं त्याच्या आईने पाहिलं. याबद्दल, आईने मुलाची विचारपूस केली असता त्याने रडत रडत त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल सर्व काही त्याच्या आईला सांगितलं. संरक्षण गृहात सुपरवायझर मुलासोबत घृणास्पद कृत्य करत असल्याचं कळताच पीडित मुलाच्या आईच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर, तातडीने या प्रकरणाबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
हे ही वाचा: ठाणे: वर्षभरापासून फुकटात वीजेचा वापर... आरोपीची ट्रिक जाणून कंपनीला देखील बसला धक्का! 'इतक्या' वीजेची चोरी अन्...
मुलाच्या आईने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, सईदाबाद पोलिसांकडून 11 ऑक्टोबर रोजी आरोपी सुपरवायझर विरोधात पोक्सो अॅक्ट (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.