मतदार याद्यांमध्ये एवढे घोळ असताना निवडणुका कशा घेता? राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला 8 मोठे सवाल
Raj Thackeray questions to State Election Commission : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला 8 मोठे सवाल; बैठकीत काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला 8 मोठे सवाल

मनसेसह महाविकास आघाडीच निवडणूक आयोगाला मोठे सवाल
Raj Thackeray, Mumbai : मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि कम्युनिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष पध्दतीने संविधानाचे पूर्ण पालन घेण्यात यावी, या मागणीसाठी महाविकास आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत बैठक घेतली होती. दरम्यान, या बैठकीवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला काही सवाल केले आहेत.
राज ठाकरेंनी विचारलेले 7 प्रश्न
निवडणूक लागलेली नाही मग मतदार नोंदणी कशामुळे थांबवली?
वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी मतदान करु नये का?
मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहेत. मतदारांची दोन ठिकाणी नावे आहेत.