'राजाची लेक आहे, कोणाला भीत नाही..', घरावर दारुच्या बाटल्या फेकल्यानंतर गणपतराव देशमुखांच्या पत्नी आक्रमक

मुंबई तक

Solapur Politics : 'राजाची लेक आहे, कोणाला भीत नाही..', घरावर दारु बाटल्या फेकल्यानंतर गणपतराव देशमुखांच्या पत्नी आक्रमक

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"राजाची लेक आहे, कोणाला भीत नाही.."

point

घरावर दारुच्या बाटल्या फेकल्यानंतर गणपतराव देशमुखांच्या पत्नी आक्रमक

Solapur Politics : सांगोल्याचे दिवंगत नेते आणि 11 वेळेस आमदार झालेल्या गणपतराव देशमुखांच्या घरावर शुक्रवारी (दि.10) दारुच्या बाटल्या फेकण्यात आल्या. हा प्रकार भाजपची रॅली सुरु असताना घडलाय. त्यामुळे भाजपच्या या रॅलीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत आता गपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या सांगोल्यात पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांनी शुक्रवारी (दि.10) घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.

हेही वाचा : Govt Job: 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये ऑफिसर पदावर भरती व्हायचंय? आता कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी...

मी 27 खेड्याची जहागीरदार आहे - रतनबाई देशमुख 

रतनबाई देशमुख म्हणाल्या, कधी माझ्या दाराला हात कोणी लावला नाही. मी काय त्यांना भीत नाही. मी एक राजाची लेक आहे. मी 27 खेड्याची जहागीरदार आहे. देशमुखाच्या कुटुंबाच्या नादी लागन सोपं नव्हं. अनेकांचे प्रपंच धुळीला लागलेत.. ही कृती करणाऱ्या व्यक्तीला कडक शासन व्हावं. कोणतं सरकार त्यांना सोडवते ते मी बघणारच आहे. आत्तापर्यंत आमच्या घराला कोणी हात लावला नाही. मी काय त्यांना भीत नाही मी राजाची लेक आहे. मी 27 खेड्याची जहागीरदार आहे, असा इशाराही रतनाबाई देशमुख यांनी दिला आहे.

दरम्यान, शेतकरी कामगार पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेशासाठी निघालेल्या मिरवणुकीमधील माथेफिरू कार्यकर्त्याने कैलासवासी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूच्या बाटल्या आणी दगड फेकल्याने सांगोल्यातील वातावरण तापले आहे. याच्या निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी आज (दि.10) सांगोला बंदची हाक दिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp