Govt Job: 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये ऑफिसर पदावर भरती व्हायचंय? आता कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी...
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या रेग्युलर बेस पदांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये मोठ्या पदांवर निघाली भरती

आता कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा ऑफिसर पदावरील नोकरी...
SBI Recruitment 2025: सरकारी बँकेत ऑफिसर पदावर नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या रेग्युलर बेस पदांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 8 ऑक्टोबरपासून sbi.bank.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 28 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करु शकतात.
काय आहे पात्रता?
SBI च्या डेप्यूटी मॅनेजर पदावरील भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून इकोनॉमिक्स विषयात मास्टर्स डिग्री/ इकोनॉमिमेट्रिक्स/ मॅथेमेटिकल इकोनॉमिक्स/ फायनान्शियल इकोनॉमिक्स विषयात किमान 60 टक्के गुणांसह डिग्री किंवा समकक्ष पात्रता असणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे.
वयोमर्यादा: तसेच, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 30 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांच्या वयाच्या गणना 1 ऑगस्ट 2025 तारखेच्या आधारे केली जाईल.
पगार: 64,820 रुपये ते 93,960 रुपये (याव्यतिरिक्त इतर सरकारी भत्ते)