ओला, उबर अशा अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवांसाठी 'हा' नवा नियम लागू... राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता भाड्याचे दर सुद्धा...

मुंबई तक

राज्य सरकारकडून शुक्रवारी (10 ऑक्टोबर) अ‍ॅप -आधारित टॅक्सी सेवांसाठी (ओला, उबर, रॅपिडो इ.) 'महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, 2025' हा मसुदा जाहीर केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

अॅप आधारित टॅक्सी सेवांसाठी 'हा' नवा नियम लागू...
अॅप आधारित टॅक्सी सेवांसाठी 'हा' नवा नियम लागू...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवांसाठी 'हा' नवा नियम लागू...

point

राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Motor Vehicle Aggregator Rules: राज्य सरकारकडून शुक्रवारी (10 ऑक्टोबर) अॅप-आधारित टॅक्सी सेवांसाठी (ओला, उबर, रॅपिडो इ.) 'महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, 2025' हा मसुदा जाहीर केल्याची बातमी समोर आली आहे. सार्वजनिक वाहनांच्या चालकांवर नियमांनुसार नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हे नियम जारी करण्यात आले आहेत. अॅप आधारित टॅक्सी सेवा ही अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरक्षित बनवणे हेच या नियमांचे उद्देश आहेत. 

नियमांमध्ये 'या' तरतुदींचा समावेश   

या नियमांमध्ये वाढीव किंमत म्हणजेच सर्ज प्रायजिंग मर्यादित करणे, भाडे कमी करण्यास प्रतिबंध करणे आणि चालकांचे कामाचे तास मर्यादित ठेवणे यासारख्या तरतुदींचा समावेश आहे. राज्य सरकारकडून 17 ऑक्टोबरपर्यंत या मसुदा नियमांवर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. हे नियम ओला, उबर आणि ई-रिक्शा सारख्या सर्व प्रवासी मोचर वाहन अॅग्रीगेटर्सवर लागू होणार आहेत. तसेच, यामध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी अनिवार्य अॅक्सेसिबिलिटी फीचर्स समाविष्ट आहेत.

भाड्याचे दर

या मसुदा नियमांनुसार, प्रवाशांची मागणी वाढल्यास अॅप भाड्याचे दर वाढवू शकतात. पण, ते मूळ भाड्याच्या 1.5 पटांपेक्षा अधिक असू शकत नाही. यासोबतच, मागणी कमी असल्यास भाड्याचे दर हे मूळ दराच्या 25 टक्के पेक्षा कमी ठेवता येणार नाहीत. सध्या, नियमांच्या आभावामुळे भाड्याच्या दरांमध्ये होणाऱ्या वाढीवर राज्य सरकारचं काहीच नियंत्रण नसल्याचं दिसून येत आहे. याव्यतिरिक्त, प्रवाशांकडून आकारण्यात येणारं सुविधा शुल्क मूळ भाड्याच्या 5 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा आणि एकूण कपात 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.

ड्रायव्हर दररोज जास्तीत जास्त 12 तासांपर्यंतच अॅपमध्ये लॉगिन राहू शकतात आणि त्यानंतर 10 तासांची विश्रांती देणं अनिवार्य असल्याचं संबंधित नियमांमध्ये निश्चित करण्यात आलं आहे. ऑनबोर्डिंग पूर्वी, चालकांना 30 तासांचा ओरिएन्टेशन आणि मोटिव्हेशन ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण करणं आवश्यक आहे. ज्या चालकांना पाच पैकी दोन स्टारपेक्षा कमी रेटिंग आहे त्यांना उपचारात्मक प्रशिक्षण घ्यावं लागेल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp