पाच वर्षांचा चिमुकला मांडीवर बसलेला असताना आईने स्वत:वर अॅसिड ओतलं, अन् नंतर दोघेही...
Crime News : पाच वर्षांचा चिमुकला मांडीवर बसलेला असताना आईने स्वत:वर अॅसिड ओतून घेतलं, अन् नंतर दोघेही
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पाच वर्षांचा चिमुकला मांडीवर बसलेला असताना आईने स्वत:वर अॅसिड ओतून घेतलं

मध्यप्रदेशातील इंदुरमधील घटना
Crime News : मध्यप्रदेशातील इंदुरमधून अंगावर काटा आणणारी आणि अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. नवविवाहितेने पाच वर्षांचा चिमुकला मांडीवर असताना स्वत:वर अॅसिड टाकून घेतल्याची घटना घडलीये. सुमन असं स्वत:वर अॅसिड ओतून घेणाऱ्या महिलेचं नाव आहे. घटना घडली त्यावेळी आई आणि पाच वर्षांचा चिमुकला दोघेच घरात होते. अॅसिड टाकून घेतल्यामुळे दोघेही गंभीरपणे जखमी झाले होते. कुटुंबियांना समजताच त्यांनी दोघांनाही रुग्णालयात नेले. परंतु गुरुवारी रात्री मुलाचा आणि शुक्रवारी सकाळी आईचा मृत्यू झाला. हा प्रकार राऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहार कॉलनीत घडला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास घडली, तर पोलिसांना याबाबतची माहिती रात्री 9 वाजता रुग्णालयाकडून मिळाली.
माहितीनुसार, कैलाश पटेल आपल्या कुटुंबासह येथे राहतात. 23 वर्षीय सुमन यांनी आपल्या 5 महिन्यांच्या मुलावर पहिल्यांदा अॅसिड टाकले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. सुमन बहुतेक वेळा घरातच असायची. घटनेनंतर परिसरात आणि कुटुंबात शोकाचे वातावरण पसरले आहे.