हॉटेलमधून दुसऱ्या महिलेच्या हातात हात घालून पती बाहेर आला, समोर उभी होती पत्नी.. भररस्त्यात झिंझ्याच उपटल्या!

मुंबई तक

Crime News : एका महिलेनं तिच्या पती आणि त्याच्या प्रेयसीवर मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधील महाराजपूर पोलीस ठाणे परिसरात नरवाल मोडजवळ घडली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पती आणि त्याच्या प्रेयसीवर मारहाणीचे गंभीर आरोप

point

भररस्त्यात काय घडलं?

Crime News : एका महिलेनं पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडवर मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधील महाराजपूर पोलीस ठाणे परिसरात नरवाल मोडजवळ घडली आहे. मंगळवारी एका हॉटेलबाहेर पती, पत्नी आणि पतीच्या कथित प्रेयसीमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला होता. हा हाय-व्होल्टेज नाट्य तब्बल एक तासापासून सुरुच होतं. 

हे ही वाचा : नाशिक हादरलं! कंटाळा आला म्हणून तरुणाने आईची केली हत्या, नंतर स्वत:च पोलीस ठाण्यात झाला सरेंडर

नेमकं प्रकरण काय? 

एका वृत्तमाध्यमानुसार, महाराजपूरमधील एका गावातील एका महिलेनं सांगितलं की, तिचा विवाह  2018 मध्ये झाला होता आणि तिला तीन मुलं आहेत. राजकोटमधील रहिवासी असलेला तिचा पती दिवाळीसाठी दोन दिवस घरी परतला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी तो तिच्या प्रेयसीला भेटण्यास नरवार मोरे येथील एका हॉटेलात गेला. पत्नी देखील हॉटेलमध्ये गेली. तिने तिचा पती त्याच्या प्रेयसीसोबत हातात हात घालून हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिल्यानंतर ती संतापली. 

दोघींनी एकमेकींचे केस ओढले

या प्रकरणात आरोप केला की, तिचा पती गेल्या तीन वर्षांपासून त्या महिलेशी संबंधात होता आणि तिने त्यांना यापूर्वी अनेकदा रंगेहाथ पकडले होते. हॉटेलबाहेर, दोन्ही कुटुंबाकडून शा‍ब्दिक वाद बघायला मिळाला होता. पत्नीने तिच्या मैत्रिणीलाच मारहाण केली नाही,तर तिच्या पतीलाही मारहाण करत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही महिलांनी एकमेकींचे केस ओढले आणि रस्त्यावर एकच गोंधळ उडाला होता. 

हे ही वाचा : पुणे: तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप, नंतर तरुणीला मारहाण, अखेर बॉयफ्रेंडची हत्या, नंतर मृतदेह चादरीत गुंडाळून...

अधिकाऱ्यांकडून बघ्याची भूमिका

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, घटनास्थळी दाखल उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. तब्बल एक तासभर गोंधळ सुरु होता. रस्त्याने जाणाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच घटनास्थळावरून पतीला हकलवून देण्यात आले होते. या प्रकरणात कसलीही लेखी तक्रार आली नसल्याचं सांगितलं. संबंधित व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी केली जात आहे आणि तक्रार आल्यास योग्य ती करवाई केली जाईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp