नाशिक हादरलं! कंटाळा आला म्हणून तरुणाने आईची केली हत्या, नंतर स्वत:च पोलीस ठाण्यात झाला सरेंडर

मुंबई तक

nashik crime : आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने कंटाळा आला म्हणून आपल्याच आईची हत्या केली आहे.

ADVERTISEMENT

nashik crime
nashik crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा

point

मुलाने केला आईचा खून

point

स्वत:च झाला सरेंडर

nashik crime : आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने कंटाळा आला म्हणून आपल्याच आईची हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री नाशिकमध्ये जेल रोडवरील शिवाजीनगर परिसरात घडली आहे. या घटनेनं नाशिक हादरून गेलं आहे. आरोपीचं नाव अरविंद मुरली धर (वय 58) असे त्यांचं नाव आहे. तसेच खून करण्यात आलेल्या आईचं नाव यशोदाबाई मुरलीधर पाटील (वय 80) असे आहे. त्याने खूनबाबत कारणंही सांगितलं आहे. 

हे ही वाचा : रुणाला ऑनलाईन गेमचं व्यसन, 50 लाखांच्या कर्जाचा डोंगर, आईच्या गळ्यावर स्क्रूड्रायव्हरने हल्ला करत संपवलं

मुलाने आईच्या खूनाबाबत काय सांगितलं? 

मुलाने आपल्या आईचा खून करण्यामागचं कारण सांगितलं की, 'मला कंटाळा आला होता म्हणून मी मा‍झ्या आईची हत्या केली', असं तो म्हणाला आणि त्यानंतर तो पोलीस ठाण्यात जाऊन स्वत:हून सरेंडर झाल्याचं वृत्त इंडिया टीव्ही या वृत्त माध्यमाने दिलं आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी तत्काळपणे त्याला ताब्यात घेतले आणि घरात जाऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली. तेव्हा घरात पोलिसांना यशोदाबाईंचा मृतदेह आढळल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. संबंधित प्रकरणात आरोपीला नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : जळगावात आईच्या मृतदेहाचे काही भाग गायब, चोरट्यांनी अस्थीसह सोनं नाणंही नेलं पळवून, कुटुंबीयांचं मन हेलावलं

पत्नी सोडून निघून गेली

मिळालेल्या एकूण माहितीनुसार, आरोपी अरविंदला उर्फ बाळू या नावाने ओळखले जाते. दरम्यान, तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो विवाहित असून त्याची मानसिकता बिघडल्याने त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले जात आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp