जळगावात आईच्या मृतदेहाचे काही भाग गायब, चोरट्यांनी अस्थीसह सोनं नाणंही नेलं पळवून, कुटुंबीयांचं मन हेलावलं

मुंबई तक

Jalgaon crime : जळगाव शहरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव महापालिकेच्या हद्दीतील असलेल्या स्मशानभूमीत एका महिलेच्या मृतदेहावरून चोरट्यांनी सोनं चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

Jalgaon crime
Jalgaon crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जळगाव शहरात माणुसकीला काळिमा

point

चोरीसाठी मृदेहाचे काही भाग केले गायब

Jalgaon crime : जळगाव शहरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव महापालिकेच्या हद्दीतील असलेल्या स्मशानभूमीत एका महिलेच्या मृतदेहावरून चोरट्यांनी सोनं चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छबाबाई पाटील या महिलेचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले होते. मात्र, अंत्यसंस्कार केल्यानंतर अस्थी मिळवण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला वाईट अनुभव आला. 

हे ही वाचा : पुणे: तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप, नंतर तरुणीला मारहाण, अखेर भावाला हाताशी धरत बॉयफ्रेंडची हत्या, मृतदेह चादरीत गुंडाळून...

आईच्या मृतदेहाच्या डोक्याचा आणि पायाचा भाग गायब

अंत्यसंस्कारानंतर कुटुंब आपल्या आईच्या अस्थी मिळवण्यासाठी स्माशानभूमीत आले होते. तेव्हा त्यांच्या आईच्या डोक्याचा आणि पायाचा भाग गायब असल्याचा माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आईच्या जाण्याचं दु:ख ताजं असतानाच त्यांच्याच आईचा मृतदेहाचा अर्धा भाग चोरट्यांनी पळवल्याची मन सून्न करून टाकणारी घटना आहे. या घटनेनं स्मशानभूमीवरील प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. 

संबंधित स्मशानभूमि ही जळगाव हद्दीत येते, याच ठिकाणी अशी घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनं स्थानिक प्रशासनावर देखील प्रश्न केला जात आहे. यावरच मुंबई तकशी बोलताना कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

हे ही वाचा : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातील अंतरिम सुनावणी संपली, काय काय घडलं?

कुटुंबियांनी व्यक्त केली भावना

कुटुंबिया म्हणाले की, आई गेली म्हणजे आभाळभर माया करणारं छत्र गेलं. त्यानंतर अस्थीसोबत जे काही झालं आहे ते अगदी निंदणीय आहे. आमच्या कुटुंबियांवर भावनिक आघात झाला आहे. ज्यांनी सोनं नेलं ते जाऊदे पण, आम्हाला आमच्या अस्थी हव्या आहेत. महानगरपालिकेचा हा भोंगळ्या कारभाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp