तरुणाला ऑनलाईन गेमचं व्यसन, 50 लाखांच्या कर्जाचा डोंगर, आईच्या गळ्यावर स्क्रूड्रायव्हरने हल्ला करत संपवलं

मुंबई तक

Crime News : ऑनलाईन गेमच्या नादात तरुणावर 50 लाख कर्जाचा बोजा होता.  त्यानंतर तरुणाने सोनं चोरी करताना आईला पाहिलं आणि आपल्या बदनामी होणार या भीतीनं मुलाने स्क्रू ड्रायव्हरने आईवरच हल्ला केला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑनलाईन गेमच्या नादात तरुणावर 50 लाख कर्जाचा बोजा

point

तरुणाने घरातील सोनं केलं चोरी

point

आईलाही सोडलं नाही

Crime News : ऑनलाईन गेमच्या नादात तरुणावर 50 लाख कर्जाचा बोजा होता.  त्यानंतर तरुणाने सोनं चोरी करताना आईला पाहिलं आणि आपल्या बदनामी होणार या भीतीनं मुलाने स्क्रू ड्रायव्हरने आईवरच हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेत अटक केली. ही घटना उत्तर प्रदेशातील रायबरेलीतील आहे. या घटनेनं सर्वच हादरून गेले आहेत. घरातील सोनं चोरी करताना आईनं पाहिलं असता, तिनं आरडाओरड केली. तेव्हा तरुणाने स्क्रू ड्रायव्हरने तिची हत्या केली. तो एवढ्यावरच न थांबता त्याने सिलिंडरने हल्ला केला आणि तो घरातील सोनं घेऊन पळून गेला. या प्रकरणात आरोपी मुलाला अटक केली आहे. अटकेत असलेल्या मुलाचं नाव निखील असे आहे. तर आईचं नाव रेनू असल्याचं समजतंय. 

हे ही वाचा : पुणे: तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप, नंतर तरुणीला मारहाण, अखेर बॉयफ्रेंडची हत्या, नंतर मृतदेह चादरीत गुंडाळून...

ऑनलाईन गेमचं भयानक व्यसन

निखिलला वर्षभरापासून ऑनलाईन गेमचं भयानक असं व्यसन लागलं होतं. त्यानं यामध्ये 50 लाख रुपये गमावले होते. ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्जही घेतलं होतं. तसेच हे कर्ज फेडण्यासाठी त्यानं 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घरातच चोरी करण्याचा प्लॅन आखला. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांची दुचाकी गाडी घेतली आणि त्रिवेणी एक्सप्रेसने पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

निखिल पदवीचं शिक्षण घेत होता. त्याला ऑनलाईन गेम खेळण्याचं अधिकच व्यसन होतं. एका वर्षभारतच त्याने एक दोन नाही,तर तब्बल 50 लाख गेमिंगमध्ये घालवले होते. त्याने वेगवेगळ्या अॅपवरून कर्जही घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पण त्याच्या अंगावर कर्जाचा डोंगल वाढू लागल्याने त्याच्या मनस्थितीवर मोठा परिमाण झाला होता. 

हे ही वाचा : चोरीच्या प्रकरणात जेलमध्ये, सिनेमात काम करण्यासाठी बाहेर आला, 'डँबिस बाबू'च्या हत्येने नागपुरात खळबळ

आईच्या मानेवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला

अंतिमक्षणी कर्ज देणाऱ्यांकडून त्याला ब्लॅकमेलंही केलं गेले. पैसे देण्यासाठी अनेकदा दबावही टाकण्यात आला होता. याच दबावातून त्याने सोनं नाणं चोरी करण्याचा प्लॅन आखत तिजोरीतून सोनं चोरी करत आईच्या मानेवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेव्हा आईचा मृतदेह हा रक्तबंबाळ अवस्थेत घरातच पडला. तेव्हाच मुलाने नातेवाईकांना फोनद्वारे संपर्क करत घरात कोणी तरी अज्ञात लोक घुसल्याचं सांगितलं.मी घरातून बाहेर पळून आलोय. दरोडेखोल माझा पाठलाग करत असल्याचं त्याने फोनद्वारे संपर्क करत सांगितलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp