भाजपची रॅली सुरु असताना दिवंगत गणपतराव देशमुखांच्या घरावर दारुच्या बाटल्या फेकल्या, ओमराजे निंबाळकर संतापले...

मुंबई तक

Solapur News : भाजपच्या रॅली सुरु असताना दिवंगत गणपतराव देशमुखांच्या घरावर दारुच्या बाटल्या फेकल्या, ओमराजे निंबाळकर संतापले...

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या रॅली सुरु असताना दिवंगत गणपतराव देशमुखांच्या घरावर दारुच्या बाटल्या फेकल्या

point

ओमराजे निंबाळकर आणि रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

Solapur News : सोलापुरातील सांगोला तालुक्यात भाजपकडून रॅली काढण्यात आली होती. मात्र, या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचं समोर आलंय. सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या घरावर दारुच्या बाटल्या फेकण्यात आल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय. शिवाय, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत संताप व्यक्त केलाय.

सत्तेचा माज आणि संस्कृतीचा अपमान, ओमराजेंनी भाजप नेत्यांना सुनावलं 

ओमराजे निंबाळकर म्हणाले, सत्तेचा माज आणि संस्कृतीचा अपमान…महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठता आणि आदर्श नेतृत्वाचं प्रतीक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, त्या स्व. गणपतराव आबा देशमुख यांच्या सांगोला येथील घरावर भाजपच्या रॅलीदरम्यान दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या. ही केवळ धक्कादायक नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीवर झालेली एक अमानुष चाप आहे. ही तीच भाजपा आहे का जी स्वतःला “संस्कृतीरक्षक” म्हणवते? पण त्यांच्या रॅलीतून बाहेर येतंय दारूची नशा, गुंडगिरीची भाषा आणि सत्तेचा उन्माद!

हेही वाचा : योगेश कदम म्हणाले घायवळला परवाना दिला, CM फडणवीस म्हणतात परवाना नाही दिला... नेमकं काय खरं?

पुढे बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, स्व. गणपतराव आबा सारख्या लोकनेत्यांच्या घरावर अशी घाणेरडी कृत्यं करून भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे की सत्ता जेव्हा अहंकाराच्या नशेत चढते, तेव्हा माणुसकीचं भान हरवतं. ज्यांच्या घराचं दार बंद असतानाही आदर्शाचा सुगंध दरवळतो, त्या देशमुख कुटुंबावर झालेला हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणातील अधःपाताचं जिवंत उदाहरण आहे. महाराष्ट्र म्हणजे संयम, आदर आणि संस्कारांची भूमी.पण सध्याचं सरकार हेच संस्कार पायदळी तुडवत आहे — ना शिष्टाचार उरलेत, ना आदर्श. ही केवळ बाटली फेकण्याची घटना नाही, तर महाराष्ट्राच्या विचारसरणीवर फेकलेली घाण आहे. दारूच्या नशेत बुडालेली ही सत्ता लोकांच्या जागृतीसमोर फार काळ टिकणार नाही. कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करत नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp