मुंबईची खबर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट! 'इतक्या' स्टील ब्रिजचं बांधकाम पूर्ण...
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) कडून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट!

तब्बल 'इतक्या' स्टील ब्रिजचं बांधकाम पूर्ण...
Mumbai News: देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या कामाला वेग आला असल्याचं सांगितलं जात आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) कडून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये या योजनेच्या 10 व्या ब्रिजचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.
NHSRCL ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी 10 वा स्टील ब्रिज लॉन्च अहमदाबाद जिल्ह्यात स्थापित करण्यात आला आहे, तसेच हा या क्षेत्रातील पहिला स्टील ब्रिज असल्याचं NHSRCL ने सांगितलं आहे.
हे ही वाचा: Govt Job: 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये ऑफिसर पदावर भरती व्हायचंय? आता कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी...
'इतक्या' वजनाचं स्टील ब्रिज...
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, या स्टील ब्रिजचं काम पूर्ण करणं हे अतिशय आव्हानात्मक होतं. 12 मीटर उंची आणि 11.4 मीटर रुंदीचा हा 485 मेट्रिक टन स्टील ब्रिज वर्धा (नागपूर, महाराष्ट्र) येथील एका कार्यशाळेत बांधण्यात आला असून तो खास डिझाइन केलेल्या ट्रेलरचा वापर करून अहमदाबादला आणण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, या पुलाच्या बांधकामात सुमारे 20360 टॉर्क्स-शीअर प्रकारचे उच्च शक्ती (TTHS) बोल्ट वापरले गेले आहेत.
हे ही वाचा: भाजप पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवली, त्याच मामा पगारेंना हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेतलं, डोंबिवलीत मोठं आंदोलन
संपूर्ण रूटवर किती स्टील ब्रिज?
अहमदाबादमधील मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन व्हायाडक्ट 31 क्रॉसिंगमधून जातो ज्यामध्ये रेल्वे ट्रॅक, फ्लायओव्हर, कालवे, साबरमती नदीवरील नदी पूल आणि सहा स्टील ब्रिज यांचा समावेश आहे. संपूर्ण कॉरिडॉरसाठी एकूण 28 स्टील पूल बांधण्याची योजना आहे, त्यापैकी 17 गुजरातमध्ये आणि 11 महाराष्ट्रात असल्याची माहिती आहे. बुलेट ट्रेनची चाचणी गुजरातमध्ये होणार असून ती सुरत आणि बिलीमोरा दरम्यान होणार असल्याची शक्यता आहे. मागील महिन्याभरात रेल्वे मंत्र्यांनी दोन वेळा बुलेट ट्रेनच्या कामाचं निरीक्षण केलं आहे. तसेच, गुजरामध्ये बुलेट ट्रेनच्या आठ स्थानकांचं सिव्हिल वर्क पूर्ण झालं असून या स्थानकांवर आता आवश्यक सुविधा तयार करण्यात येत आहे.