गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या मुलासोबत फोटो दिसला, सनकी बॉयफ्रेंडने क्रूरतेचा कळस गाठला, अन्....
Crime News : गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या मुलासोबत फोटो दिसला, सनकी बॉयफ्रेंडने क्रूरतेचा कळस गाठला, अन्....
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या मुलासोबत फोटो दिसला

सनकी बॉयफ्रेंडने क्रूरतेचा कळस गाठला अन् गर्लफ्रेंडची हत्या केली
Crime News : दिल्लीतील कोटला मुबारकपूर परिसरातील भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका तरुणीच्या खून प्रकरणात मोठा खुलासा झालाय. पोलीस तपासानंतर या प्रकरणातील मोठं गुढ उकललं आहे. या प्रकरणात पोलिसांनी 8 ऑक्टोबर रोजी हरियाणातील हांसी येथून संशयित प्रियकर हिमांशु याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत सांगितले की, त्याने आपल्या प्रेयसीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या युवकासोबतचे फोटो पाहिल्याने संतापाच्या भरात तिला चाकूने भोसकले.
डीसीपी अंकित चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबरच्या संध्याकाळी कोटला मुबारकपूर पोलिसांना प्रताप गल्लीत एका घराच्या पायऱ्यांवर रक्त सांडल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, पहिल्या मजल्यावरील खोलीत 25 वर्षीय साक्षी गुरूंग ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर, मानेला आणि खांद्यावर चाकूचे गंभीर घाव होते. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तपासात साक्षी ही त्या घरात एकटीच राहत असल्याचे आणि तिचे आई-वडील निधन पावल्याचे समोर आले.
हेही वाचा : 40 लोकांना अश्लील मॅसेज पाठवण्यात आल्याचा दावा, अमरावतीतील माजी न्यायाधीशाकडून 31 लाख रुपये लुबाडले अन्...
हत्याकांड उघडकीस आणण्यासाठी एसीपी ऑपरेशन अरविंद कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आरोपी हरियाणाला जात असल्याचे आढळले आणि त्याची ओळख पटली.