विवाहितेचे एकाच वेळी दोन तरुणांसोबत प्रेमसंबंध! संतापलेल्या प्रियकराने दिली मोठी शिक्षा, मुलीला सुद्धा सोडलं नाही...
एका 35 वर्षीय तरुणाने आपली प्रेयसी आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर आरोपी तरुणाने स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

एकाच वेळी दोन तरुणांसोबत प्रेमसंबंध!

संतापलेल्या प्रियकराने दिली मोठी शिक्षा

नेमकं प्रकरण काय?
Crime News: गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील सनंद तालुक्यातील लोदारियार गावात एका 35 वर्षीय तरुणाने आपली प्रेयसी आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर आरोपी तरुणाने स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण 'मर्डर-सुसाइड' असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी तरुणाचं नाव रंचोड परमार असून तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता. जवळपास 20 दिवसांपासून आरोपी लोदारियार गावात एका भाड्याच्या घरात राहत होता. संबंधित तरुण हा विवाहित असून त्याच्या पत्नीपासून घटस्फोटाचा(पोटगी) खटला न्यायालयात सुरू होता.
गळ्यावर धारदार शस्त्राने वार
तसेच, आरोपीचे ज्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते, ती विवाहित असून तिला दोन वर्षांची मुलगी सुद्धा होती. शुक्रवारी संबंधित महिला आपल्या मुलीसोबत रंचोड येथील तिच्या भाड्याच्या घरात आली होती. त्या दिवशी, रात्री उशीरा तिघांचेही मृतदेह खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळले. तिघांच्याही गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते.
हे ही वाचा: पत्नी-पत्नीमधील वाद टोकाला पोहोचला! पत्नीची निर्घृण हत्या अन् पुरावे मिटवण्यासाठी घरात लावली आग...
प्रेयसीचे दुसऱ्याच तरुणासोबत प्रेमसंबंध
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना घटनास्थळावरून 8 पानांची सुसाइड नोट सापडली. आरोपी तरुणाने नोटमध्ये लिहिलं होतं की, त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्याच तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याने आरोपीला खूप मानसिक त्रास झाला. ज्या व्यक्तीचे त्याच्या प्रेयसीसोबत प्रेमसंबंध होते, ती व्यक्ती तिला सतत धमकवायची आणि याच कारणामुळे आरोपीला सतत मानसिक तणाव आणि अपमानाचा सामना करावा लागत होता. याच कारणामुळे रागाच्या भरात संबंधित तरुणाने आपल्या प्रेयसीची आणि तिच्या लहान मुलीची हत्या केली. हत्येनंतर, त्याने स्वत:च्या गळ्यावर चाकून वार करुन आयुष्य संपवलं.