गणिताच्या शिक्षकावर राग, विद्यार्थ्याने मानेत चाकूच खुपसला.. वर्षभरापूर्वी नेमकं काय घडलेलं?

मुंबई तक

Crime News : शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने आपल्याच शिक्षिकेचा खून केला, नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा

point

विद्यार्थ्याने शिक्षकाच्या मानेवर केला हल्ला 

point

नेमकं काय घडलं?

Crime News : शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने आपल्याच शिक्षिकेचा खून केला. शिक्षक हा बिहारच्या भाखरूआनमधील गया रोडवरील अपग्रेडेड उच्च माध्यमिक शाळेत गणित विषय शिकवायची. ही घटना शुक्रवारी भाखरुआन वळणावर घडली. शिक्षिकाचं नाव सुदामा कुमार असे आहे. तो मुफस्सिला पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्यातील 'या' तारखेला काही राशीतील लोकांचे नशीब बदलणार, काय सांगतं राशीभविष्य?

अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकाच्या मानेवर केला हल्ला 

या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी शिक्षक म्हणाले की, ते दररोज बिहारच्या औरंगाबादहून दौडनगरला बसने प्रवास करतात आणि शाळेचे मुख्याध्यापक पवन कुमार यांची वाट बघत थांबायचे. अल्पवयीन विद्यार्थी त्याच ठिकाणी आले आणि थेट शिक्षकाच्या मानेवर हल्ला करण्यास सुरुवात केली. 

वृत्तमाध्यमानुसार, धारदार चाकूच्या हल्ल्याने शिक्षक सुदामाच्या मानेतून रक्ताची चिळकांडी उडाली अख्ख शरीर रक्तबंबाळ झालं. रक्ताच्या थारोळ्यात माखलेल्या सुदामाला तत्काळपणे दौडनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले, त्यानंतर डॉक्टरांनी शिक्षकावर उपचार सुरु केले. डॉक्टांनुसार शिक्षकाच्या मानेला दहा टाके घालण्यात आले आहेत. 

हे ही वाचा : पुणे: "चंद्रकांत पाटलांचा कर्मचारी निलेश घायवळच्या संपर्कात..." धंगेकरांचा आरोप आणि शिवसेना-भाजपातच जुंपली

आरोपीवर एफआरआय गुन्हा 

पीडित शिक्षकाने सांगितलं की, विद्यार्थ्याचे शाळेत असभ्य वर्तन होते. त्याला शाळेतून रस्टिकेट करण्यात आले होते. हाच राग मनात ठेवून विद्यार्थ्याने हल्ला केल्याचा शिक्षकाने संशय व्यक्त केला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर आरोपीवर एफआरआय नोंदवला. या घटनेमुळे शिक्षकांमध्ये संताप व्यक्त करत भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp