पतीच्या मित्रासोबत महिलेचे अनैतिक संबंध, शारीरिक संबंधाला चटावली आणि प्रियकरासोबत पतीलाच...
प्रियकराच्या प्रेमात अखंड बुडालेल्या एका महिलेने मोठा कट रचून आपल्याच पतीचा काटा काढल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पतीच्या हत्येचा पत्नीने रचला प्लॅन

गरोदर पत्नीने पतीसोबतच केला मोठा गेम!

नेमकं प्रकरण काय?
Crime News: प्रियकराच्या प्रेमात अखंड बुडालेल्या एका महिलेने मोठा कट रचून आपल्याच पतीचा काटा काढल्याची बातमी समोर आली आहे. चिकनचं दुकान चालवणारा रिहान हा उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या मसूरी परिसरात राहणाऱ्या आसिफचा खूप जुना आणि चांगला मित्र होता. आपल्या मित्राच्या घरी रिहानचं सतत येणं-जाणं असायचं. अचानक मार्च 2024 मध्ये एका आरोपाखाली आसिफला तुरुंगात जावं लागलं. दरम्यान, आसिफची पत्नी प्राची आणि रिहान यांच्यात जवळीकता वाढत गेली आणि दोघेही एकत्र राहण्याचे स्वप्न पाहू लागले. परंतु, आसिफ दोघांच्या प्रेमसंबंधात आड येत होता.
पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय
एप्रिल 2025 मध्ये आसिफ जामिनावर तुरुंगातून घरी परतला मात्र, त्यानंतर त्याला त्याच्या पत्नीच्या बदलत्या वागण्यामुळे आणि तिच्या मोबाईलच्या गोपनीयतेवरुन संशय आला. त्याने याबाबत पत्नीला जाब विचारला आणि तिचा फोन स्वतःकडे ठेवला. दरम्यान, प्राचीने रिहानला आपल्या पतीचा काटा काढण्याचं सुचवलं आणि आसिफच्या हत्येचा कट रचण्यात आला.
विषारी औषध देऊन पतीच्या हत्येचा प्रयत्न
आसिफला संपवण्यासाठी रिहानने प्राचीला विषारी औषध दिलं. खाण्याच्या पदार्थात हे औषध मिसळून पतीची हत्या करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, हत्येचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. यावेळी, दोघांनी आसिफची हत्या करण्याचं ठरवलं.
हे ही वाचा: पुणे: "चंद्रकांत पाटलांचा कर्मचारी निलेश घायवळच्या संपर्कात..." धंगेकरांचा आरोप आणि शिवसेना-भाजपातच जुंपली
गोळीबार करत आसिफला संपवलं
7 ऑक्टोबर 2025 त्या संध्याकाळी जवळपास 8:15 वाजताच्या सुमारास आसिफच्या हत्येच्या प्लॅनला सुरूवात झाली. गाझियाबादच्या रफीकाबाद फाट्याजवळील झुडुंपाच्या मागे रिहान, बिलाल, जीशान, उवैश, गुलफाम आणि दानिश असे पाच लोक लपले होते. प्रत्येकाच्या हातामध्ये पिस्तूल होतं. त्यावेळी, प्राचीने रिहानला फोन करुन आसिफ घरातून बाहेर पडल्याचं सांगितलं. आसिफ त्याच्या स्कूटीवरून घरातून बाहेर पडला आणि तो रफीकाबाद फाट्याजवळ पोहोचताच अचानक फायरिंग सुरू झाली. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. यामध्ये, आसिफच्या छातीला एक गोळी लागली आणि तो जागीच कोसळला. या हल्ल्यात आसिफचा जागीच मृत्यू झाला. काही तासांनंतर, पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.