लॉजवरच्या रुममध्ये होते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, अचानक नको ते घडलं आणि दोघांचाही गेला जीव!
एका अविवाहित जोडपं लॉजच्या एका खोलीत मृतावस्थेत आढळलं. संबंधित तरुणी आणि तरुणाचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रेयसी आणि प्रियकर एकत्र लॉजच्या खोलीत बंद...

अचानक घडली भयानक घटना अन्...
Crime News: एका अविवाहित जोडपं लॉजच्या एका खोलीत मृतावस्थेत आढळलं. संबंधित तरुणी आणि तरुणाचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. ही घटना गुरुवारी (9 ऑक्टोबर) बंगळुरूच्या येलाहंका न्यू टाउनमध्ये घडली. बागलकोट जिल्ह्याच्या हुंगुंड तालुक्यातील रहिवासी असलेली कावेरी (24) आणि गडग जिल्ह्यातील गजेंद्रगढ येथील रहिवासी रमेश बांदीवद्दार (25) अशी मृतांची ओळख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पीडित गुरुवारी दुपारी लॉजमध्ये थांबण्यासाठी आले होते आणि अचानक आग लागल्याने त्यात दोघांचा मृत्यू झाला.
आग लागल्याने अविवाहित जोडप्याचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी जवळपास 5 वाजताच्या सुमारास दोघेही खोलीत असतानाच अचानक आग लागली. त्यावेळी कावेरीने रूम सर्व्हिसला फोन करुन खोलीत आग लागल्याची सूचना दिली होती. त्यानंतर, लॉजच्या कर्मचाऱ्यांनी लगेच फायर इंजिन विभागाला याबाबत महिली दिली आणि आतून बंद असलेला खोलीचा दरवाजा तोडण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. मात्र, जेव्हा कर्मचारी खोलीत गेले तेव्हा रमेशचं शरीर जळाल्याने त्याचा मृत्यू झाला होता आणि कावेरी खोलीतील शौचालयात बेशुद्ध पडली होती. त्यानंतर, पीडितेला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
हे ही वाचा: रात्री अडीच वाजता 60 वर्षांच्या वृद्ध महिलेला निर्जनस्थळी नेलं अन् केलं भयंकर कृत्य... नेमकं घडलं तरी काय?
पोलिसांचा तपास
पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून आता आग लागण्याचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सची प्रतिक्षा आहे. त्या लॉजमध्ये एकूण 6 खोल्या होत्या. मात्र, आग आसपासच्या खोलींपर्यंत पसरली असून देखील इतर खोल्यांमध्ये काही दुर्घटना घडली नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. आत तपास अधिकाऱ्यांकडून संबंधित घटनेचा तपास केला जात असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: पुण्यात ATS आणि पोलिसांची प्रचंड मोठी कारवाई, 'त्या' 18 जणांचा नेमका काय होता प्लॅन?
प्राथमिक तपासानुसार, पीडित तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध असून त्यांच्या कुटुंबियांचा या नात्याला विरोध असल्याचं समोर आलं. रमेश आणि कावेरी खोलीत गेल्यानंतर रमेशने पेट्रोल टाकून खोलीत आग लावली आणि कावेरी त्या आगीपासून वाचण्याच्या प्रयत्नात शौचालयात पळून गेली असता तिथे ती बेशुद्ध झाली. यामुळेच, पीडित कावेरीचा मृत्यू झाला. सध्या, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.