पुण्यात ATS आणि पोलिसांची प्रचंड मोठी कारवाई, 'त्या' 18 जणांचा नेमका काय होता प्लॅन?
Pune ATS Operation: पुण्यात 8 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ATS आणि पुणे पोलिसांनी प्रचंड मोठी कारवाई करत 18 जणांना दहशतवादी कनेक्शच्या संशयावरून अटक केली होती. ज्याबाबत आता नवनवी माहिती समोर येत आहे.
ADVERTISEMENT

पुणे: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे बुधवारी (8 ऑक्टोबर) रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत पुण्यातील कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात छापेमारी केली. दहशतवादी कनेक्शनच्या संशयावरून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आतापर्यंत किमान 18 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, कोंढवा, खडकी, खडक, वानवडी आणि भोसरी यासह पुण्यातील सुमारे 20 ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली. देशविरोधी कृत्यांच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांचे उपायुक्त (DCP) निखिल पिंगळे यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, "या मोठ्या कारवाईसाठी ATS चे 200 कर्मचारी आणि पुणे पोलिसांचे सुमारे 500 अधिकारी तैनात करण्यात आले होते."
या छापेमारीदरम्यान, अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अत्यंत संवेदनशील तपासाचा भाग आहे. पुढील कारवाई गुप्तचर यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून असेल. सुरक्षेच्या कारणास्तव, या कारवाईबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
कोथरूड तपासातून मिळालेल्या माहितीवर कारवाई
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई कोथरूड येथील एका आधीच्या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. या तपासादरम्यान दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती, ज्यांचे दहशतवादी कनेक्शन असल्याचे नंतर उघड झाले. त्यांच्या चौकशीतून "पुणे मॉड्यूल" नावाच्या दहशतवादी गटाची माहिती समोर आली, ज्यामुळे ही नवीन कारवाई करण्यात आली.