पारूचा कहर... आली लहर अन् केले बिकिनीवरचे फोटो शेअर!
Smita Gondakar Photos: मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने नुकतेच तिचे काही बोल्ड आणि मादक असे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बिकिनी लूकमध्ये पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्मिता गोंदकर पुन्हा एकदा तिच्या बोल्ड आणि फिटनेस अवताराने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिने नुकतीच इंस्टाग्रामवर तिच्या नव्या बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. समुद्रकिनारी फिकट हिरव्या रंगाची बिकिनी परिधान करून तिने कॅमेरासमोर मादक पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून प्रचंड लाइक्स मिळत आहेत.

स्मिता गोंदकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिने 'मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड' (2016), 'फायनल ट्रॅप' आणि 'डिटेक्टिव्ह करण' सारख्या चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. तसेच, ती 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सिझनमध्ये (2018) स्पर्धक म्हणून झळकली होती, जिथे तिची हसतमुख वृत्ती आणि स्मितहास्याने तिने प्रेक्षकांना प्रभावित केलेलं. अमेरिकेतील डिस्ने क्रूझ लाईनसोबत काम केलेल्या स्मिताने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे मराठी म्युझिक व्हिडिओ 'पप्पी दे पारूला' देखील खूप लोकप्रिय झालं होतं.

या नव्या फोटोशूटबाबत बोलताना, स्मिताने इंस्टाग्रामवर कॅप्शन दिले आहे: "समुद्राच्या वाऱ्यात आणि अव्यक्त स्वप्नांमध्ये गुंतलेली, मी वास्तव आणि स्वप्नांमध्ये प्रवास करते - जिथे महासागर त्याचे रहस्य ठेवतो आणि मी एक होते." असं म्हणत तिने तिचे मादक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती पुन्हा ट्रेंडिंगमध्ये दिसत आहेत. तिच्या फिट बॉडी आणि नैसर्गिक स्मितहास्याने चाहते फिदा झाले आहेत. "हॉटनेस ओव्हरलोड!", "मराठमोळी ब्युटी क्वीन!" अशा कमेंटही चाहते करत आहेत.

स्मिताचा हा बोल्ड अवतार नवीन नाही. यापूर्वी 2023 मध्ये तिने बिकिनीतील हॉट फोटोज शेअर केले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली होती. तसेच, 2019 मध्ये 'येरेयेरे पैसा २' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान स्विमिंग पूलजवळील बिकिनी फोटोशूटनेही तिला चर्चेत आणलं होतं. मराठी अभिनेत्री म्हणून ती आपल्या फिटनेस रूटीनमुळे ओळखली जाते. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर (smitagondkar) लाखो फॉलोअर्स आहेत, जिथे ती नियमितपणे आपले वर्कआऊट, ट्रॅव्हल आणि पारंपारिक लूक शेअर करते.