मुंबईची खबर: सी लिंक, BKC ला विमानतळाशी जोडणारा नवीन सबवे, 3 फेज अन् रस्ता तर... नव्या प्रोजेक्टविषयी जाणून घ्या

मुंबई तक

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट दरम्यानच्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळवण्यासाठी या मार्गांना जोडणाऱ्या एका अंडरग्राउंड रस्त्याचं बांधकाम करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

सी लिंक, BKC ला विमानतळाशी जोडणारा नवीन सबवे
सी लिंक, BKC ला विमानतळाशी जोडणारा नवीन सबवे
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सी लिंक, BKC ला विमानतळाशी जोडणारा नवीन सबवे

point

नव्या प्रोजेक्टविषयी सविस्तर जाणून घ्या

Mumbai News: मुंबईमध्ये कोस्टल रोडची निर्मिती झाल्यानंतर सुद्धा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या मार्गांना जोडणाऱ्या एका अंडरग्राउंड रस्त्याचं बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 24,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून बांधला जाणार असून प्राधिकरणाने या प्रोजेक्टसाठी  प्राथमिक टेंडर जाहीर केलं आहे.

'इंटीग्रेटेड सबवे कनेक्टिंग'

गेल्या सोमवारी उपमुख्यमंत्री आणि MMRDA चे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली. त्यानंतर, लगेच मंगळवारी टेंडर जाहीर करण्यात आलं. हे टेंडर म्हणजेच निविदा सल्लागार स्वरूपाची असून यासाठी सल्लागाराने प्रकल्पाचा तांत्रिक-व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करणे आवश्यक आहे. 10 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर हा टेंडरचा कालावधी असून MMRDA कडून यासाठी 17.50 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेला मुंबई कोस्टल रोड ते बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशन आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 पर्यंत 'इंटीग्रेटेड सबवे कनेक्टिंग' म्हटलं गेलं आहे. 

योजनेचे तीन टप्पे

पहिला टप्पा- वरळी सी ब्रिज, बीकेसी, बुलेट ट्रेन स्टेशन आणि विमानतळाकडे जाणारा 16 किमी लांबीचा चार पदरी रस्ता

दुसरा टप्पा: पूर्व-पश्चिम कनेक्शनसाठी 10 किमी लांबीचा चार पदरी रस्ता

हे वाचलं का?

    follow whatsapp