दोन्ही मित्रांचे प्रेमसंबंध! समलैंगिक संबंधातून घडली भयानक घटना; नंतर, यूट्यूबवर व्हिडीओ बघून भलताच गेम

मुंबई तक

एका तरुणाने यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडीओ बघून हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत शिकून घेतली आणि आपल्या मित्राचीच निर्घृण हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

यूट्यूबवर व्हिडीओ बघून भलताच गेम
यूट्यूबवर व्हिडीओ बघून भलताच गेम
social share
google news

बातम्या हायलाइट

point

समलैंगिक संबंधातून घडली भयानक घटना

point

नंतर, यूट्यूबवर व्हिडीओ बघून भलताच गेम

Crime News: एका तरुणाने यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडीओ बघून हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत शिकून घेतली आणि आपल्या मित्राचीच निर्घृण हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या. 

दोन्ही मित्रांमध्ये समलैंगिक संबंध

अशोक नावाचा एक तरुण हा आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्याचा मूळ रहिवासी असून तो काही कळापासून खम्मम येथे राहत होता. तिथे त्याची ओळख 40 वर्षाच्या वेंकटेश्वरलु नावाच्या तरुणाशी झाली. खरंतर, वेंकटेश्वरलु बंजारा गावाचा रहिवासी असून एका खाजगी कंपनीत कार्यरत होता. दोघांमधील संवाद वाढत गेला आणि कालांतराने त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. मात्र, त्यांच्यातील हे नातं समलैंगिक संबंधात बदललं. वेंकटेश्वरलु दोघांमध्ये वयाने मोठा असल्याकारणाने तो बऱ्याचदा अशोकला आर्थिक मदत करायचा. शेतीत नुकसान होऊनही तो त्याला पैसे देत राहिला. पण कालांतराने त्यांच्यात भांडणं वाढत गेली.

यूट्यूब (YouTube) वर व्हिडिओ पाहिले अन्...

15 सप्टेंबरच्या रात्री, वेंकटेश्वरलु अशोकच्या घरी गेला. दरम्यान त्यांचं बोलणं सुरू असताना, काही कारणावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यावेळी, संतापलेल्या अशोकने वेंकटेश्वरलुवर बरेच वार केले आणि यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आता मृतदेह ठिकाणी लावायचा तरी कसा? हा अशोकसमोर मोठा प्रश्न होता. मग त्याने इंटरनेटवर यासंबंधी योग्य पद्धत शोधण्याचा विचार केला. त्याने यूट्यूब (YouTube) वर व्हिडिओ पाहिले आणि मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी कसे टाकायचे ते तो शिकला.

मृतदेहाचे तुकडे करून पिशवीत भरले 

व्हिडीओ बघून आरोपी अशोकने वेंकटेश्वरलुच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले. त्यानंतर त्याने शहरातील करुनागिरी परिसरातील काही झुडुपे आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्या पिशव्या टाकल्या. तसेच, हत्येनंतर, त्याने खोली स्वच्छ केली, रक्ताचे डाग सुद्धा पुसून काढले आणि सर्वकाही सामान्य दाखवण्यासाठी प्रयत्न केला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp