छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही, देवेंद्र फडणवीसांकडून क्लीन चीट मिळताच योगेश कदमांची पोस्ट
Yogesh Kadam facebook post : छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही, देवेंद्र फडणवीसांकडून क्लीन चीट मिळताच योगेश कदमांची पोस्ट
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही, योगेश कदमांची पोस्ट चर्चेत

देवेंद्र फडणवीसांकडून क्लीन चीट मिळताच योगेश कदमांची पोस्ट
Yogesh Kadam facebook post : मकोका अंतर्गत गुन्हे दाखल असलेल्या सचिन घायवळ या गुंडाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्रपरवाना दिल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता. ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत योगेश कदमांवर गंभीर आरोप केले होते. शिवाय योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आणि योगेश कदम यांना क्लीनचीट दिली. त्यानंतर योगेश कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, जी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
देवेंद्र फडणवीस योगेश कदमांना क्लीनचीट देताना काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'एक सुनावणी गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती. पण हा परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तूस्थिती लक्षात आणून दिली. त्यामुळे हा परवाना दिलेला नाही. परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की, अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता. परंतु परवाना दिला गेलेला नाही.'
योगेश कदम यांची पोस्ट जशीच्या तशी
2019 पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते.