'ही कसली पद्धत? व्हिडीओ शूटींग करा रे...',शिरुरच्या आजी-माजी आमदारांमध्ये मतदान केंद्राबाहेर बाचाबाची VIDEO
Shirur Nagarpalika election : शिरुरचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यात मतदान केंद्रात जाण्याच्या मुद्यावरुन मोठा वाद झालाय
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिरुरच्या आजी-आमदारांमध्ये मतदान केंद्रावर शाब्दिक बाचाबाची
हायहोल्टेज ड्रामा; पाहा व्हिडीओ
शिरूर : नगरपालिका निवडणुकीच्या मतदान सुरु असताना शहरात राजकारण चांगलंचं तापलेलं पाहायला मिळालं. शहरातील आडत बाजार येथील उर्दू शाळेतील मतदान केंद्राबाहेर आजी व माजी आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. शिरुरचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यात मतदान केंद्रात जाण्याच्या मुद्यावरुन मोठा वाद झालाय. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.
आमदार कटके हे मतदारांची गर्दी, मतदानाची गतीमानता तसेच एकूण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देत होते. त्याच क्रमाने ते उर्दू शाळेतील मतदान केंद्रात आले. त्यांच्या भेटीची माहिती मिळताच माजी आमदार अशोक पवार यांनी तात्काळ त्या केंद्राकडे धाव घेतली. त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : मुंबईची खबर: मुंबईच्या 'या' शहरातील 9 मेट्रो प्रोजेक्ट्सबाबत सरकारचं मोठं पाऊल! व्याजमुक्त कर्ज अन्...
आमदार कटके मतदान केंद्रातून बाहेर पडताच पवार यांनी त्यांच्यावर आक्षेप घेत त्यांना सरळ जाब विचारला. मतदान चालू असताना आपण वारंवार मतदान केंद्रांमध्ये का जात आहात? असा सवाल अशोक पवार यांनी सार्वजनिकरीत्या केला. यावर कटके यांनीही प्रत्युत्तर देत आपण फक्त परिस्थितीची पाहणी केली असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले. यावरून दोघांमध्ये काही काळ जोरदार शाब्दिक चकमक झाली. काही क्षणांसाठी वातावरण हाताबाहेर जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती.










