मुंबईची खबर: मुंबईच्या 'या' शहरातील 9 मेट्रो प्रोजेक्ट्सबाबत सरकारचं मोठं पाऊल! व्याजमुक्त कर्ज अन्...

मुंबई तक

ठाणे आणि मुंबई दरम्यान मेट्रो प्रोजेक्ट्स प्रगतीपथावर नेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

9 मेट्रो प्रोजेक्ट्सबाबत सरकारचं मोठं पाऊल!
9 मेट्रो प्रोजेक्ट्सबाबत सरकारचं मोठं पाऊल!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईच्या 'या' शहरातील 9 मेट्रो प्रोजेक्ट्सबाबत सरकारचं मोठं पाऊल!

point

व्याजमुक्त कर्ज अन्...

Mumbai News: ठाणे आणि मुंबई दरम्यान मेट्रो प्रोजेक्ट्स प्रगतीपथावर नेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) मुंबई-ठाणे परिसरातील नऊ मेट्रो प्रकल्पांसाठी 500 कोटींचे व्याजमुक्त कर्ज मंजूर करण्यात आलं असल्याचं वृत्त आहे. हे प्रकल्प आता लवकरच पूर्ण होणार असल्याची मुंबईकरांकडून अपेक्षा केली जात आहे. दहिसर, मीरा रोड, ठाणे, कल्याण इत्यादी मार्गांवरील प्रकल्पांसाठी नगरविकास विभागाने हे कर्ज मंजूर केले असून हे कर्ज 50 टक्के केंद्र सरकारच्या करांवर आणि 100 टक्के स्थानिक करांवर तसेच जमिनीच्या किमतींवर देण्यात आलं असल्याची माहिती आहे.

वाहतूक कोंडी कमी होणार असल्याची अपेक्षा...  

या कर्जातून विविध प्रकल्पांसाठी MMRDA ला निधी ट्रान्सफर करण्यात आला आहे. ठाणे-मुंबई-भिवंडी मार्गावर धावणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन 5 साठी 52 कोटी38 लाख 60 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रूटमुळे ठाणे शहर आणि जिल्ह्यातील रहिवाशांना लक्षणीय सुविधा मिळेल तसेच या प्रोजेक्टमुळे वाहतूक कोंडी कमी होणार असल्याची सुद्धा अपेक्षा आहे. याशिवाय, ठाणेकरांना मुंबईच्या इतर मेट्रो मार्गांशी चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: मुंबई: 15 वर्षांच्या मुलीचं 32 वर्षीय पुरुषाशी बळजबरीने लग्न! इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध... अखेर, पीडितेने हिंमत दाखवली अन्...

इतर प्रोजेक्ट्ससाठी सुद्धा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो लाईन 6 (स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी) साठी 32 कोटी 95 लाख 20 हजार रुपये देण्यात आले असून मुंबई मेट्रो लाईन 2A साठी 28 कोटी 89 लाख 70 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

हे ही वाचा: विधवा महिला शेतात प्रियकराला भेटायला गेली, दीर आणि सासऱ्याने रंगेहात पकडलं अन्... अखेर घडली भयानक घटना

इतर प्रोजेक्टसाठी सुद्धा ‘इतका’ निधी मंजूर  

मुंबई मेट्रो लाईन 4 आणि 4A म्हणजेच वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली आणि कासारवडवली-गायमुख या मार्गांसाठी 98 कोटी 72 लाख 80 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच, मुंबई मेट्रो लाईन 7 (अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व) साठी 49 कोटी 63 लाख 20 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुंबई मेट्रो लाईन 9 (दहिसर-मीरा रोड) आणि मार्ग 7A (अंधेरी-छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) प्रोजेक्टसाठी एकूण 66 करोड 71 लाख 40 हजार रुपये देण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp