मुंबई: 15 वर्षांच्या मुलीचं 32 वर्षीय पुरुषाशी बळजबरीने लग्न! इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध... अखेर, पीडितेने हिंमत दाखवली अन्...
15 वर्षांच्या मुलीचं तिच्या दुप्पट वयाच्या म्हणजेच 32 वर्षांच्या पुरूषाशी बळजबरीने लग्न लावल्याच्या आरोपाखाली मुंबईतील मालाड पोलिसांनी एकाच कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
15 वर्षांच्या मुलीचं 32 वर्षीय पुरुषाशी बळजबरीने लग्न!
तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध...
अखेर, पीडितेने हिंमत दाखवली अन्...
Mumbai Crime: 15 वर्षांच्या मुलीचं तिच्या दुप्पट वयाच्या म्हणजेच 32 वर्षांच्या पुरूषाशी बळजबरीने लग्न लावल्याच्या आरोपाखाली मुंबईतील मालाड पोलिसांनी एकाच कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. पीडित अल्पवयीन नवविवाहितेच्या 32 वर्षीय पतीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. तसेच, या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा सुद्धा पोलीस शोध घेत असल्याचं सांगितलं जात आहे.
घरच्यांनी बळजबरीने लग्न लावलं अन्...
दाखल झालेल्या एफआयआरनुसार, पीडित महिला तिच्या मोठी बहीण, दाजी आणि आजीसोबत मालाडमध्ये राहते. ती तिथल्या एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षण घेत असल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेने पोलिसांना या प्रकरणबाबत सांगितलं की, तिची बहीण, दाजी आणि आजीने गेल्याच वर्षी तिचे बळजबरीने लग्न लावलं, तेही तिच्या दुप्पट वयाच्या पुरूषासोबत. संबंधित पुरुष हा पीडितेच्या बहिणीचा दीर आहे. आरोपी पती एक रंगकर्मी असल्याचं तिने सांगितलं. जेव्हा पीडित तरुणीने त्या पुरुषासोबत लग्न करण्यास नकार दिला तेव्हा तिच्या घरच्यांनी आरोपी (पती) सोबत तिचे लग्न लहानपणीच ठरवलं असून म्हणून, तिने लग्न करणं भाग असल्याचं तिला सांगण्यात आलं. तिच्या पतीला माहित होतं की त्याची होणारी पत्नी ही अल्पवयीन आहे आणि हे लग्न बेकायदेशीर आहे. तरीही, त्याने तिला लग्नासाठी भाग पाडलं. अखेर, आरोपीचा हट्ट आणि कुटुंबियांच्या दबावामुळे पीडिता लग्न करून सासरी गेली.
हे ही वाचा: Govt Job: 10 वी पास उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल पदासाठी नवी भरती! काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले
पीडितेने एफआयआरमध्ये दिलेल्या जबाबानुसार, जुलै 2024 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान तिच्या पतीने तिच्यावर बऱ्याचदा वेळा लैंगिक अत्याचार केले. त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि तिने नकार दिल्यास तिला मारहाण आणि धमक्या देण्यास सुरूवात केली. पीडितेने तिच्या पतीच्या अत्याचारांबद्दल तिच्या मोठ्या बहिणीकडे आणि आजीकडे तक्रार केली पण, त्यांनी तिला कसलीच मदत केली नसल्याचं पीडिता म्हणाली.
हे ही वाचा: गेवराईनंतर आता बीड शहरातही दगडफेक, मतदानादिवशी तुफान राडा; धडकी भरवणारा व्हिडीओ
पोलिसांनी दिली माहिती
अखेर, पतीच्या आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून ती दोन दिवसांपूर्वी मालाड पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिथल्या पोलिसांना तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल तिने सांगितलं. हे ऐकून पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ताबडतोब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत कळवलं आणि त्यानंतर मालाड पोलिसांनी पीडितेच्या जबाबाच्या आधारे पीडितेचा पती, मोठी बहीण, मेहुणा आणि आजीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता, या प्रकरणातील आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.










