विधवा महिला शेतात प्रियकराला भेटायला गेली, दीर आणि सासऱ्याने रंगेहात पकडलं अन्... अखेर घडली भयानक घटना
कुटुंबातील विधवा महिलेच्या अनैतिक प्रेमसंबंधामुळे तिच्या दीर आणि सासऱ्याने तिच्यासोबत भयानक कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विधवा महिला शेतात प्रियकराला भेटायला गेली अन्...
दीर आणि सासऱ्याने महिलेला रंगेहात पकडलं
अखेर प्रेमसंबंधातून घडली भयानक घटना
Crime News: राजस्थानमधील जयपूरच्या मौखमपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील बाडूलाव गावात एक धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या अंधारात शेतात अचानक लागलेल्या आगीमुळे गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. सुरुवातीला लोकांना वाटलं की झोपडीला अचानक म्हणजेच अपघातातून आग लागली असावी, परंतु जेव्हा सत्य उघडकीस आलं तेव्हा यामागे प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं.
रात्री 11 वाजताच्या सुमारास, गावा बाहेर असलेल्या एका शेतात आगीचा धूर निघताना दिसला. गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना एका मचानाजवळ आग लागलेली दिसली. ती आग विझवल्यानंतर त्यांना एक महिला आणि एक पुरूष आगीत गंभीररित्या भाजलेले आढळले. त्यानंतर, दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
महिला आणि पुरुष गंभीररित्या जखमी
मात्र, त्या आगीत भाजलेल्या दोन्ही पीडितांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, आमच्यावर पेट्रोल टाकून आम्हाला जाळण्यात आलं. या प्रकरणाबाबत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. चौकशीतून आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीने सर्वच चकित झाले. सोनी गुर्जर आणि कैलाश गुर्जर अशी या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या दोघांची ओळख समोर आली.
नात्यातील तरुणासोबत प्रेमसंबंध अन्...
सोनी जवळपास सहा वर्षांपासून विधवा होती आणि दोन मुलांची आई होती. ती तिच्या दीर आणि चुलत सासऱ्यांसोबत राहत होती. केलाश हा त्यांच्याच कुटुंबातील एक नातेवाईक असून त्याचं सोनीच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. दरम्यान, सोनी आणि कैलाश दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले आणि त्यानंतर, ते बऱ्याचदा शेतावर भेटायला जात होते.










