Govt Job: 'या' बँकेकडून पोस्ट विभागात निघाली मोठी भरती! थेट अर्ज करा अन्... काय आहे पात्रता?
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) कडून ग्रामीण डाक सेवक (GDS)च्या 348 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'या' बँकेकडून पोस्ट विभागात निघाली मोठी भरती!

कधीपर्यंत करू शकता अर्ज?
Govt Job: बँकिंग सेक्टरमध्ये सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) कडून ग्रामीण डाक सेवक (GDS)च्या 348 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया काल म्हणजेच 9 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात.
या भरतीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून उमेदवार ippbonline.com या IPPB च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करतेवेळी उमेदवाराचा फोटो, सही आणि आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करणं अनिवार्य आहे. तसेच, उमेदवारांना अर्जाची प्रिंटआउट 13 नोव्हेंबर 2025 पर्यंत काढता येऊ शकते.
वयोमर्यादा
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर असणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचं किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, 1 ऑगस्ट 2025 या तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना करण्यात येईल.
हे ही वाचा: पुणे: "चंद्रकांत पाटलांचा कर्मचारी निलेश घायवळच्या संपर्कात..." धंगेकरांचा आरोप आणि शिवसेना-भाजपातच जुंपली
किती मिळेल वेतन?
या भरतीमध्ये उमेदवारांच्या शैक्षणिक गुणांच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. संबंधित भरतीसाठी अर्जदारांची संख्या अधिक असल्यास संस्थेकडून ऑनलाइन परीक्षेचं सुद्धा आयोजन करण्यात येईल. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला 30,000 रुपये वेतन दिलं जाईल.