चिअर्स, संभाजीनगरचे शशी थरुर, भाषणाने संसद हलवून सोडणारे; अंबादास दानवेंची संदीपान भुमरेंसाठी पोस्ट

मुंबई तक

Ambadas Danve on Sandipanrao Bhumre : चिअर्स, संभाजीनगरचे शशी थरुर, भाषणाने संसद हलवून सोडणारे; अंबादास दानवेंची संदीपान भुमरेंसाठी अजब पोस्ट

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अंबादास दानवेंची संदीपान भुमरेंसाठी पोस्ट

point

चिअर्स, संभाजीनगरचे शशी थरुर, भाषणाने संसद हलवून सोडणारे; दानवेंकडून भूमरेंचं वर्णन

Ambadas Danve on Sandipanrao Bhumre, छत्रपती संभाजीनगर : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर टीका करण्यासाठी फेसबुक पोस्ट केलीये. या पोस्टमध्ये त्यांनी संदीपान भुमरे यांचा उल्लेख 'संभाजीनगरचे शशी थरुर' असा केलाय. सध्या अंबादास दानवे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी अंबादास दानवे यांनी ही फेसबुक पोस्ट लिहिल्याची चर्चा आहे. यापूर्वीही अंबादास दानवे यांनी भूमरेंवर अशा पद्धतीची टीका केली होती. लोकसभेच्या निवडणुकीवेळेस अंबादास दानवे यांनी देशी दारुच्या बाटल्या हाती घेऊन संदीपान भुमरे यांना ललकारलं होतं. दरम्यान, अंबादास दानवे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय? जाणून घेऊयात..

हेही वाचा : भाजप पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवली, त्याच मामा पगारेंना हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेतलं, डोंबिवलीत मोठं आंदोलन

अंबादास दानवेंची फेसबुक पोस्ट 

"सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन! संभाजीनगरचे शशी थरूर म्हणून ओळखले जाणारे खासदार साहेब यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न महिला, कामगार, रस्ते, आरोग्य आणि एकंदरीत गरीब-गरजू लोकांचे आवाज बनत सत्ताधाऱ्यांना आपल्या भाषणाने घाम फोडत आवाज नेहमीच उठवत संभाजीनगरच्या प्रत्येक प्रश्नला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हा पुरस्कार जिल्ह्याला शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आहे. संपूर्ण संसद आपल्या भाषणाने हलवून सोडणारे संदिपान भुमरे साहेब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा तर त्यांचा ज्ञानाचा आवाक्याबाहेरचा विषय नाही! असो, Cheers @sandipanbhumare1919 🥂🍻🥃", असं अंबादास दानवे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय.

संदीपान भुमरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरेंवर टीका करताना भुमरे म्हणाले होते की, अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे कधी आम्हाला भेटले नाही, ते कायम ऑफलाईन होते, ऑनलाईन भेटायचे. वर्षा बंगला आम्ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पाहिला. ठाकरे आम्हाला तिथे येऊ देत नव्हते. या टीकेनंतर दानवे यांनी अत्यंत खोचक शब्दात संदीपान भुमरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp