ठाणे: वर्षभरापासून फुकटात वीजेचा वापर... आरोपीची ट्रिक जाणून कंपनीला देखील बसला धक्का! 'इतक्या' वीजेची चोरी अन्...
ठाणे जिल्ह्यात पोलिसांकडून एका व्यक्तीच्या विरोधात तब्बल 4.19 लाख रुपयांच्या वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वर्षभरापासून फुकटात वीजेचा वापर...

आरोपीची 'ही' ट्रिक जाणून कंपनीला देखील बसला धक्का!

'इतक्या' वीजेची केली चोरी अन्...
Thane Crime: ठाणे जिल्ह्यात पोलिसांकडून एका व्यक्तीच्या विरोधात तब्बल 4.19 लाख रुपयांच्या वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण हे मुंब्राच्या कौसा परिसरातील असल्याची माहिती आहे. एका खाजगी वीज वितरण कंपनीच्या व्हिजिलेन्स टीमने निरीक्षण केलं असता मोठ्या प्रमाणात वीजेची चोरी झाल्याचं उघडकीस आलं. आरोपीची फुकटात वीज वापराची ही ट्रिक जाणून कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला.
न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, प्रकरणातील 38 वर्षीय आरोपी मागील वर्षभरापासून वीजेच्या मीटरला बायपास करून अवैधरित्या वीज वापरत होता. यादरम्यान, जवळपास 18,214 यूनिटची चोरी झाल्याचं तपासात समोर आलं. या वीजेचा बाजारभाव सुमारे 4,19,552 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
वीजेचा वापर मीटरमध्ये नोंदवला जात नव्हता
मुंब्रा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीच्या व्हिजिलेन्स टीमकडून 10 ऑक्टोबर रोजी आरोपीविरोधात कारवाई करण्यात आली. टीमने आरोपीच्या घराचा तपास केला असता त्याच्या घरातील वीजेचं कनेक्शन वीज कनेक्शन मीटरपासून तोडून थेट जोडलं गेलं असल्याचं आढळून आलं, या ट्रिकमुळे वीजेचा वापर मीटरमध्ये नोंदवला जात नव्हता.
हे ही वाचा: 75 लाख रुपयांच्या इन्शुरन्ससाठी रचला मोठा कट! आधी पत्नीला संपवलं अन् पोलिसांना दिशाभूल करण्याचा भलताच प्लॅन...
वीज कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल
संबंधित कंपनीने या वीज चोरीच्या प्रकरणात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली असून या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय वीज कायदा (Indian Electricity Act) च्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अद्याप प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली नसून, यासंबंधी तपास सुरू असल्याची माहिती आहे.