बायको असताना दुसरीला पटवलं, नंतर पळवून नेत विवाह केला, तब्बल 80 दिवस हनिमून, नंतर मोठं गुपित समोर
Viral News : एक विवाहित महिला एका मुलाच्या बापासोबत पळून गेली. त्यानंतर तिने एक दोन नाही,तर तब्बल 80 दिवस पुरूषाशी हनीमून केले, नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विवाहित महिला पुरुषासोबत गेली पळून

पुरुष त्याच्या दोन्ही पत्नींसह पोलीस ठाण्यात गेला आणि...

नेमकं प्रकरण काय?
Viral News : बिहारच्या जमुईमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक विवाहित महिला एका मुलाच्या बापासोबत पळून गेली. त्यानंतर तिने एक दोन नाही,तर तब्बल 80 दिवस पुरूषाशी हनीमून केले. अचानकपणे, तो पुरुष त्याच्या दोन्ही पत्नींसह पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांनी संबंधित परिस्थिती समजून घेताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. या प्रकरणात पुरुष, पत्नी आणि दुसरी महिला यांच्यात वाद झाला. ही घटना बिहारीमधील जुमईतील बरहाट पोलीस ठाणे परिसरातील आहे.
हे ही वाचा : चहा पिताच महिलेला झाला भलताच आजार, चिकटपट्टी लावून करावा लागतो डोळा बंद! कारण...
राहुलचे विवाहित महिलेशी दुसरा विवाह
राहुल कुमार हा बरहाट येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचे तिथे एक दुकानही आहे. 2021 मध्ये त्याने एका रेणू कुमारी नावाच्या तरुणीशी विवाह केला होता. त्यानंतर आता त्यांना तीन वर्षांची एक मुलगीही आहे. या विवाहानंतर सर्वकाही व्यवस्थित सुरु होतं. पण एक दिवशी राहुलची जुमई रेल्वे स्थानकावर गीता कुमारी नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. त्याचवेळी रेणु कुमारी आणि राहुलच्या नात्यात दरी निर्माण होऊ लागली होती.
राहुलच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले होते. यानंतर गीताची राहुलसोबत भेट झाली होती. गीतने राहुलला सांगितलं की, तिचा पती रवी कुमार हा नशेत असताना तिच्यावर शारीरिक अत्याचार करत असल्याने तिनं सासर सोडण्याचा निर्णय घेतला. राहुलनं पाठिंबा दिला आणि दोघेही तासनतास फोनवर बोलू लागले होते.
दोघांनी मिळून 80 दिवसांची हनीमून ट्रिप केली
त्यानंतर त्यांच्या नात्यात अधिक जवळीकता वाढल्यानंतर ते दोघेही घरातून पळून गेले. त्यांनी विवाह केला आणि दार्जिलिंग आणि जम्मू-काश्मीरसह देशातील अनेक ठिकाणी हनीमून ट्रिपवर गेले. सुमारे 80 दिवसांनंतर, राहुल त्याची दुसरी पत्नी गीतासोबत बरहाट येथील त्याच्या घरी परतला. दुसऱ्या पत्नीला पाहून त्याची पत्नी रेणू कुमारी संतापली आणि तिने दोघांनाही तिने पकडलं आणि पोलीस ठाण्यात घेऊन आली.