दोन मुलांची आई पण 16 वर्षांच्या मुलावर जीव जडला, दोघेही पळून गेले अन् कुटुंबियांसमोर मोठा पेच

मुंबई तक

Crime News : दोन मुलांची आई पण 16 वर्षांच्या मुलावर जीव जडला, दोघेही पळून गेले अन् कुटुंबियांसमोर मोठा पेच

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दोन मुलांची आई पण 16 वर्षांच्या मुलावर जीव जडला

point

दोघेही पळून गेले अन् कुटुंबियांसमोर मोठा पेच

Crime News : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुलांची आई असलेल्या ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर 16 वर्षीय मुलाला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार प्रेमसंबंधाशी संबंधित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेच्या शेजारी 16 वर्षीय मुलगा राहत होता. दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले आणि हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. रोज ते दोघे भेटू लागले. किशोराच्या आई-वडिलांना सुरुवातीला काहीच संशय आला नाही, कारण त्या महिलेशी त्यांच्या मुलाचं वय खूपच वेगळं होतं.

दरम्यान, ती महिला आपल्या मावशीकडे गीडा परिसरात राहायला गेली आणि तिने त्या 16 वर्षीय मुलालाही तिकडे बोलावायला सुरुवात केली. त्यावेळी किशोराच्या आई-वडिलांना या नात्याबद्दल कळलं. त्यांनी मुलाला समजावलं – “बाळा, हे चुकीचं आहे, असं करू नकोस.” पण काही दिवसांनंतर तो मुलगा अचानक घरातून गायब झाला.

हेही वाचा : मला पाडण्यासाठी भाजपने 5 कोटी दिले, स्थानिक निवडणुकीत तुकडा सुद्धा देणार नाही, अजितदादांच्या आमदाराचं वक्तव्य

हे वाचलं का?

    follow whatsapp