3 एकर जमिनीवर 3 कोटींचं कर्ज दाखवलं, वसुलीसाठी जमिनीचा लिलाव, अजित पवारांच्या निकटवर्तीयाचा प्रताप

मुंबई तक

Ajit Pawar : 3 एकर जमिनीवर 3 कोटींचं कर्ज दाखवलं, वसुलीसाठी जमिनीचा लिलाव, अजित पवारांच्या निकटवर्तीयाचा प्रताप

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

3 एकर जमिनीवर 3 कोटींचं कर्ज दाखवलं, वसुलीसाठी जमिनीचा लिलाव

point

अजित पवारांच्या निकटवर्तीयाचा प्रताप

Ajit Pawar, Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्ती असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन केशव जगताप यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून भलताच प्रताप केल्याचे प्रकरण समोर आलंय...बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून केशव जगताप यांनी अवघ्या तीन एकर जमिनीवर तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे दाखवले. त्यानंतर कर्जाच्या वसुलीसाठी जमिनीचा लिलाव करण्यात येत असल्याने एक सर्वसामान्य कुटुंब हतबल झाले आहे. नेमकं या शेतकऱ्याबाबत काय घडलंय? हे जाणून घेऊयात...

हेही वाचा : रत्नागिरी: गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; प्रवचन सांगणाऱ्या कोकरे महाराजाच्या आवळल्या मुसक्या

एखाद्या गरीब शेतकऱ्याला वारंवार कर्जाची मागणी करुन देखील कर्ज मंजुरी मिळत नाही. पतसंस्था देखील कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय कर्ज देत नाहीत. मात्र, बारामती तालुक्यातील एका कुटुंबियाच्या बाबतीत वेगळा प्रकार घडलाय. कर्जाची मागणी नसताना देखील एका पतसंस्थेने त्यांच्या नावावर तीन कोटी रुपयांचं कर्ज दिलंय. हा प्रकार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष केशवराव जगताप यांच्या पतसंस्थेने घडवून आणलाय.

फसवणूक झालेला शेतकरी काय म्हणाला?

पीडित शेतकरी सतीश कुल्हाळ म्हणाले, आम्ही कधीही त्या पतसंस्थेत गेलो नाही. आमचा आणि त्या पतसंस्थेचा कोणताही संबंध नाही. आम्ही त्या पतसंस्थेचे खातेदार, कर्जदार काहीच नाहीत. आमचा एक आनंद लोखंडे नावाचा नातेवाईक आहे, त्यांनी मला सांगितलं तुमचा सातबारा आणि फोटो पाठवा. आमचे संबंध चांगले होते, म्हणून विश्वासाने मी कागदपत्रं दिली. त्यांनी कर्ज दाखवण्यासाठी कागदपत्र घेतली. मात्र, ते गहाण ठेवणार आहेत किंवा मॉर्गेज करणार आहेत, हे सांगितलं नाही. मी सातबारा वगैरे पाठवला. त्यानंतर त्यांनी सांगितलं तुमचं एक प्रकरण करतो. मार्च एन्डला भरुन टाकतो. दरम्यान, त्यांनी पतसंस्थेत बोलावून कुटुंबियांच्या सह्या घेतल्या. विद्यानंद नागरी सहकारी पतसंस्थेत त्यांनी हे सगळं करुन घेतलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की याच पतसंस्थेतून कर्ज काढायचं आहे. मी नंतर भरुन टाकतो. मात्र, नंतर आम्हाला समजलं की, ही कागदपत्र त्यांनी सिद्धेश्वर ग्रामीण पतसंस्थेला दिली आहेत. आमचा आणि पतसंस्थेचा काही संबंध देखील नव्हता. आमच्या जमिनीची व्हॅल्यू 58 लाख रुपये निघते. पण त्यांनी तीन कोटी रुपये टाकले. या प्रकरणात सिद्धेश्वर पतसंस्था आणि आमचे नातेवाईक आनंद लोखंडे दोषी आहेत, त्यांन? हे त्यांनाच माहिती.

हे वाचलं का?

    follow whatsapp