सुनेच्या खोलीत 5 दिवस लपून राहिला प्रियकर! अचानक सासऱ्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् घडलं असं काही की...

मुंबई तक

एका विवाहित महिलेचे दुसऱ्याच पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. दोघेही लपुनछपून एकमेकांसोबत भेटत होते. एके दिवशी, तो तरुण आपल्या विवाहित प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला होता. त्यावेळी, प्रेयसीच्या सासऱ्याने त्या दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं.

ADVERTISEMENT

अचानक सासऱ्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन्...
अचानक सासऱ्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुनेच्या खोलीत 5 दिवस लपून राहिला प्रियकर!

point

अचानक सासऱ्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् घडलं भयानक...

Crime News: बिहारच्या भागलपूर शहरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेचे दुसऱ्याच पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. दोघेही लपुनछपून एकमेकांसोबत भेटत होते. एके दिवशी, तो तरुण आपल्या विवाहित प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला होता. त्यावेळी, प्रेयसीच्या सासऱ्याने त्या दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यावेळी, संबंधित महिलेला जाब विचारला असता तिने धक्कादायक गोष्ट  सांगितली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंगेर जिल्ह्यातील तारापुर येथे राहणाऱ्या साक्षीचं (काल्पनिक नाव) जवळपास एक वर्षापूर्वी अंगारी गावातील बिट्टू उर्फ सिकंदर कुमार सिंग नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतरच, बिट्टू कामानिमित्ताने बंगळुरूला गेला. 

पती घरी नसल्याचा फायदा घेतला अन्...

दरम्यान, साक्षीचे तिच्या जुन्या प्रियकर राहुल सिंगसोबत पुन्हा सूत जुळले आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. खरंतर, बिट्टूने गावात आपल्या कुटुंबापासून वेगळं  एक नवीन घर बांधलं होतं. तिथे साक्षी एकटीच राहत होती. पती घरी नसल्याचा फायदा घेत साक्षीने पाच दिवसांपूर्वी तिच्या प्रियकर राहुलला घरी बोलवलं. तिच्या कुटुंबियांना तिचा संशय येऊ नये म्हणून तिने आजारी असून स्वयंपाक करता येत नसल्याचं कुटुंबातील लोकांना भासवलं. प्रियकर राहुल घराच्या बाल्कनीत एका छोट्या खोलीत राहत होता.

हे ही वाचा: मुंबईची खबर: ठाणे मेट्रोबाबत मोठी अपडेट! आता केवळ 'इतकीच' स्थानके खुली होणार... नेमकं कारण काय?

दोघांचं लग्न लावून देण्यात आलं

गेल्या रात्री, साक्षीचे सासरचे लोक तिला जेवण देण्यासाठी तिच्या गेले असता त्यांनी त्यांच्या सुनेला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. त्यावेळी गावकऱ्यांची गर्दी जमली आणि पंचायत बोलवण्यात आली. पंचायतीच्या निर्णयानंतर, दोघांचं गावातच लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत, जोडप्याने स्टॅम्प पेपवर सही केली त्यानंतर राहुलचे कुटुंबीय विधींनुसार मुलीला त्यांच्या घरी घेऊन गेले.

हे वाचलं का?

    follow whatsapp