काँग्रेसने तीन वेळेस आमदारकी दिली, 40 वर्ष एकनिष्ठ पण आता वयाच्या 68 व्या वर्षी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई तक

Former Congress MLA Bhaurao Patil joins Shiv Sena Eknath Shinde : काँग्रेसने तीन वेळेस आमदारकी दिलेल्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसने तीन वेळेस आमदारकी दिलेल्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

point

हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का

Former Congress MLA Bhaurao Patil joins Shiv Sena Eknath Shinde, हिंगोली : काँग्रेसकडून सलग तीन वेळा हिंगोली विधानसभेच नेतृत्व करणारे माजी आमदार भाऊराव पाटील यांनी आज (दि.14) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील एक मोठं नाव शिवसेनेत गेल्याने येत्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शिंदेसेनेला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळून पक्ष सोडल्याचा आरोप

गेल्या 40 वर्षापासून काँग्रेसचे एकनिष्ठ नेते आणि सलग पंधरा वर्ष हिंगोली विधानसभेचे नेतृत्व करणारे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळून अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.

हेही वाचा : बांबू उद्योग धोरण जाहीर, मुंबई उच्च न्यायालयात 2228 पदांची निर्मिती; राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय

विधानसभा निवडणूक अपक्ष लढली

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण आणि अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडीकडून भाऊराव पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी डावलून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला हिंगोली विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती, असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत विधानसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हापासून भाऊराव पाटील गोरेगावकर हे काँग्रेसमध्ये सक्रिय नसल्याचं दिसून येत होतं..

हे वाचलं का?

    follow whatsapp