सोशल मीडियावर महिला असल्याचं भासवून महिलांशी मैत्री... नंतर, प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ मिळवले अन्...

मुंबई तक

सोशल मीडियावर महिलेच्या नावाने बनावट प्रोफाइन बनवून एका तरुणाने महिलांसोबत भयंकर कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ मिळवले अन्...
प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ मिळवले अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोशल मीडियावर महिला असल्याचं भासवून महिलांशी मैत्री...

point

महिलांचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ मिळवून ब्लॅकमेलिंग

Crime News: सोशल मीडियावर महिलेच्या नावाने बनावट प्रोफाइन बनवून एका तरुणाने महिलांसोबत भयंकर कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. आरोपी तरुणाने सोशल मीडियावर मुलीच्या नावाने बनावट प्रोफाइन बनवली आणि महिलांसोबतच मैत्री करून त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ मिळवले. त्यानंतर, संबंधित तरुणाने अश्लील फोटो आणि व्हिडीओच्या आधारे महिलांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. इतकेच नव्हे तर, आरोपीने पीडित महिलांवर दबाव आणण्यासाठी आणि अधिक पैशांची मागणी करण्यासाठी त्यांच्या फोटोंचा वापर करून बनावट अकाउंट देखील तयार केले. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याचं सांगण्यात येत आहे. 

आरोपी तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल

यासंबंधी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 21 सप्टेंबर रोजी एका महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की एका अज्ञात व्यक्तीने बनावट प्रोफाइल बनवून व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून पीडितेशी ओळख केली. आरोपीने संबंधित महिलेचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ मिळवले आणि नंतर, त्याने पीडितेला ते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरूवात केली. आरोपीने पीडित महिलांकडून पैशांची मागणी केली. पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे, सायबर पोलीस स्टेशनमध्ये बीएनएसच्या कलम 308(2)/351(4)  अंतर्गत एफआयआर दाखल केली असून यासंबंधी तपास सुरू आहे. 

हे ही वाचा: बाल संरक्षण गृहात 10 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार! आईने थेट घेतली पोलिसात धाव...

पोलिसांनी केली आरोपीला अटक 

पोलिसांनी तपासादरम्यान, आरोपीने तक्रारदार महिलेशी संपर्क साधण्यासाठी वापरलेल्या फोन नंबरचे यूपीआयय ट्रेल्स, गूगल पे, सब्सक्रायबर डिटेल्स आणि आयपी अॅड्रेसचा तपास केला.  इंद्र बहादुर वर्मा अशी आरोपी तरुणाची ओळख समोर आली असून तो उत्तर प्रदेशातील लखनऊचा रहिवासी असल्याची माहिती आहे. स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने छापेमारी करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी आरोपीचा वापरात असलेला फोन जप्त केला त्यावेळी, त्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप आणि बनावट फेसबुक अकाउंट लॉगिन होते. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, आरोपी मनोजने त्याचा गुन्हा कबूल केला. 

हे ही वाचा: ठाणे: वर्षभरापासून फुकटात वीजेचा वापर... आरोपीची ट्रिक जाणून कंपनीला देखील बसला धक्का! 'इतक्या' वीजेची चोरी अन्...

महिलांना 'असं' अडकवलं जाळ्यात...

आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं की, तो सोशल मीडियावर महिलेच्या नावाने बनावट प्रोफाइल बनवून महिलांशी मैत्री करायचा. त्यांच्याशी, चॅटिंग करताना आरोपी महिलांना त्यांचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यासाठी प्रवृत्त करायचा. त्यानंतर, तो तेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी द्यायचा आणि महिलांसकडून पैसे लुबााडायचा. इतकेच नव्हे तर, त्याने पैसे देण्यासाठी पीडित महिलांवर दबाव आणण्यासाठी पीडित महिलांच्या फोटोंचा वापर करून बनावट अकाउंट्स सुद्धा बनवले होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp