प्रियकराच्या लग्नात गेली अन् सर्वांसमोर आणलं उघडकीस! पण, जमावाने तिलाच बेदम मारहाण करत अर्धनग्न केलं अन्...

मुंबई तक

अचानक, पूनम नावाची एक महिला वराची प्रेयसी असल्याचा दावा करत लग्नाच्या मंडपात आली आणि त्यानंतर लग्नातील आनंदी वातावरण तणावपूर्ण झालं. तिला मारहाण करून अर्धनग्न करण्यात आल्याचा सुद्धा पीडितेने आरोप केला.

ADVERTISEMENT

बेदम मारहाण करत अर्धनग्न केलं अन्...
बेदम मारहाण करत अर्धनग्न केलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकराच्या लग्नात गेली अन् सर्वांसमोर आणलं उघडकीस!

point

जमावाने तिलाच बेदम मारहाण करत अर्धनग्न केलं अन्...

Crime News: 30 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील खटकहेरी गावात सुनील नावाच्या तरुणाच्या लग्नाची तयारी सुरू होती. त्यावेळी, वधू आणि वर दोन्ही पक्षाचे लोक उपस्थित होते. अचानक, पूनम नावाची एक महिला सुनीलची प्रेयसी असल्याचा दावा करत लग्नाच्या मंडपात आली आणि त्यानंतर लग्नातील आनंदी वातावरण तणावपूर्ण झालं. तरुणीने सुनीलवर गंभीर आरोप केले आणि ते ऐकल्यानंतर लग्नाच्या वरातीत उपस्थित असलेल्या काही लोकांनी तिच्यावर हल्ला देखील केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, तिला मारहाण करून अर्धनग्न करण्यात आल्याचा सुद्धा पीडितेने आरोप केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई सुरू केल्याची माहिती आहे. 

वराचं सगळं सत्य आणलं उघडकीस... 

सुनीलच्या लग्नाची बातमी कळताच त्याची प्रेयसी म्हणजेच पूनम त्याच्या लग्न समारंभात आली. पूनमचा आरोप आहे की तिचे सुनीलशी बऱ्याच वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत आणि या बाबत गंगोह पोलीस स्टेशनमध्ये खटला सुरू आहे. त्यानंतर तिने लग्नाच्या मंडपात प्रवेश केला आणि सुनीलबद्दलचं सगळं सत्य उपस्थित असलेल्या लोकांना सांगितलं. लग्नातील वातावरण तणावपूर्ण बनलं. हा गोंधळ इतका वाढला की सुनील आणि लग्नाच्या वरातीत असलेल्या काही लोकांनी पूनमवर हल्ला केला. तिथल्या जमावाने पूनमला बेदम मारहाण केली आणि यामध्ये तिचे कपडे फाटून ती अर्धनग्न झाली. पूनमचा आरोप आहे की हा हल्ला तिला ठार मारण्यासाठी करण्यात आला होता.

हे ही वाचा: मुंबईची खबर: दादर-CSMT स्टेशनवरील गर्दी कमी होणार! मुंबईतील स्थानकांवर उभारणार 20 नवे प्लॅटफॉर्म्स... प्रशासनाचा मोठा निर्णय

पीडितेला बेदम मारहाण करत अर्धनग्न केलं अन्... 

पीडित तरुणीच्या आरोपानुसार, सुनीलने डॉक्टर अनुज, अंकित आणि मुकेश यांना फोन केला आणि त्यांच्या सांगण्यावरूनच हा संपूर्ण हल्ला घडवून आला. पूनमच्या तक्रारीवरून रामपूर मनिराहान पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम आणि सोनू शर्मा यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच, लग्नाचा समारंभ देखील थांबवण्यात आला असून हे प्रकरण गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनलं आहे. 

हे ही वाचा: शेतातून घरी परतत असताना महिलेचा पाठलाग केला अन् वाटेत अडवून नवविवाहितेसोबत घृणास्पद कृत्य!

पोलिसांनी दिली माहिती 

पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणबाबत माहिती देताना सांगितलं की, "या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्नात वराच्या प्रेयसीने लग्न थांबवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, लग्नाच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांनी तिच्यावर हल्ला केला. पीडितेने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून तक्रारीच्या आधारे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp