'मला Kiss कर...' शिक्षकाची अश्लील मागणी! वॉशरूममध्ये विद्यार्थीनीसोबत घाणेरडे चाळे अन्...

मुंबई तक

आरोपी शिक्षण पीडितेला शाळेच्या वॉशरूममध्ये घेऊन जायचा, तिथे तिच्याकडे चुंबन घेण्याची मागणी करायचा आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

ADVERTISEMENT

विद्यार्थीनीसोबत शिक्षकाची अश्लील कृत्ये अन्...
विद्यार्थीनीसोबत शिक्षकाची अश्लील कृत्ये अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

3 रीत शिकणाऱ्या मुलीकडे शिक्षकाची घाणेरडी मागणी!

point

शाळेतील वॉशरूममध्ये विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत्ये अन्...

Crime News: उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. येथील लुहारी गावात असलेल्या कन्या शाळा क्रमांक 2 मधील एका 9 वर्षीय विद्यार्थिनीने शिक्षकावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केल्याचं वृत्त आहे. आरोपी शिक्षण पीडितेला शाळेच्या वॉशरूममध्ये घेऊन जायचा, तिथे तिच्याकडे चुंबन घेण्याची मागणी करायचा आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी सुरू केली. या घटनेने शाळा आणि शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

शाळेतील वॉशरूममध्ये पीडितेसोबत अश्लील कृत्य... 

पीडिता तिसऱ्या इयत्तेत शिकत असून तिचा शिक्षक तिला सतत एकट्यात बोलवून चुंबन (किस) घेण्याची मागणी करायचा. इतकेच नव्हे तर, त्याने शाळेतील वॉशरूममध्ये पीडितेसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. या कारणामुळे मुलगी नेहमी घाबरलेली असायची. पीडिता अस्वस्थ दिसल्यानंतर, कुटुंबियांनी तिला याबाबत विचारलं असता तिने घाबरत तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं. त्यानंतर, मुलीच्या कुटुंबियांनी लगेच पोलिसांकडे संपर्क साधला. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई ते गोवा प्रवास अधिक सुकर होणार... 15 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार!

आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल 

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची पुष्टी करण्यात आली असून घटनेचा तपास केला जात आहे. आता पोलीस आरोपीविरुद्ध अधिक माहिती शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. 

हे ही वाचा: प्रियकराच्या नादाला लागली अन् नको ते करून बसली! मामा-मामीसोबतच केला कांड...

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी 

पीडित विद्यार्थीनीच्या पालकांनी आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, मुलांची सुरक्षितता आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी अशा घटना गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि आरोपींवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची पोलीस काळजी घेत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp