बापाने आधी दोन्ही मुलांना विष पाजलं अन् नंतर स्वत: विष प्राशन करत केली आत्महत्या! नेमकं कारण काय?

मुंबई तक

एका व्यक्तीने आपल्या दोन निरागस मुलांना विष पाजून नंतर स्वत: आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

बापाने आधी दोन्ही मुलांना विष पाजलं अन्...
बापाने आधी दोन्ही मुलांना विष पाजलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बापाने आधी दोन्ही मुलांना विष पाजलं

point

नंतर स्वत: विष प्राशन करत केली आत्महत्या!

point

नेमकं कारण काय?

Crime News: उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या दोन निरागस मुलांना विष पाजून नंतर स्वत: आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. ही भयानक घटना शनिवारी (6 डिसेंबर) चांदपूर पोलीस स्टेशन परिसरातील मुबारपूर खादर गावात घडली. 

मुलांना विष देऊन स्वत: केली आत्महत्या... 

28 वर्षीय बाबूराम नावाची व्यक्ती शनिवारी दुपारच्या सुमारास आपला पाच वर्षांचा मुलगा दीपांशू आणि तीन वर्षांची मुलगी हर्षिका यांना घराबाहेर घेऊन गेला. मुलांना गावाजवळील जंगलात नेऊन तिथे आरोपीने त्यांना विष पाजून त्यांची हत्या केली आणि नंतर स्वतः विष प्राशन करत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तिघांनाही तातडीने रुग्णालयात नेलं. त्यावेळी, मुलांची प्रकृती अतिशय गंभीर होती. मात्र, डॉक्टरांनी तपासादरम्यान त्यांना मृत घोषित केलं.

हे ही वाचा: बीड: "तू लय माजलास..." जातीवाचक शिवीगाळ करत ग्रामरोजगार सेवकाला बेदम मारहाण! दोन्ही पाय मोडले अन्...

कौटुंबिक वादातून टोकाचा निर्णय 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मृताच्या कुटुंबियांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की, मृत व्यक्ती आणि त्याच्या पत्नीचे मागील काही दिवसांपासून सतत वाद होत होते. या तणावातून पीडित पतीने टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. शनिवारी सायंकाळी रुग्णालयाच्या प्रशासनाकडून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: 402 घरांसाठी म्हाडाची बंपर लॉटर! तुमच्या स्वप्नातलं घर मिळवा अगदी स्वस्तात...

पोलिसांची माहिती 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, आता नातेवाईक मुलांचे मृतदेह घेऊन गावी गेले आहेत. तसेच, पीडित बाबूरामच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जात आहे. सध्या, पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून या घटनेमागचं नेमकं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp